इस्त्रायल आणि हमास (Israel-Palestine Conflict) यांच्यात ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेले युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे. इस्त्रायल सैन्य गाझा पट्टीवर जोरदार हल्ले करत आहे. लेबनॉनची ( Lebanon ) दहशतवादी संघटना, हिजबुल्लाह इस्त्रायलवर हल्ले करत आहे. या भयंकर युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सुरक्षा दलाने इस्त्रायलला मोठी मदत केली आहे. इस्त्रायलच्या मदतीसाठी भारतीय सुरक्षा दल पोहोचला आहे. इस्त्रायल आणि लेबनॉनच्या दक्षिण सीमेवर भारतीय सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे.
लेबनीज नागरिकांच्या हत्येच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाहने उत्तर इस्त्रायलवर हल्ला करण्याचे आवाहन केले आहे, अशा परिस्थितीत सीमेवर भारतीय दल तैनात करण्यात आला आहे. मदतीकरिता इस्त्रायलला दोन विमानवाहू युद्धनौका भूमध्य समुद्रात पाठवल्या आहेत. यूएसएस गेराल्ड आर फोर्ड आणि यूएसएस आयझेनहॉवर या अमेरिकन युद्धनौका मदतीसाठी आल्या आहेत.
(हेही वाचा – ST BUS : ठाणे जिल्हयात लालपरीला आले सुगीचे दिवस, वर्षभरात वाढले सुमारे दीड लाख प्रवासी)
इस्त्रायलमध्ये हजारो अमेरिकन नागरिक राहतात. अमेरिका नागरिकांचे रेस्क्यू सुरू करणार आहे. यासाठी अमेरिकडून विमानाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती दुतावासाकडून देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community