इस्रायलमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. (Israel-Palestine Conflict) त्यांना सतर्क आणि सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, इस्रायलहून भारताकडे जाणारी आणि येणारी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. कठीण काळात भारत इस्रायलच्या जनतेसोबत असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
सुरक्षेसाठी उड्डाणे रद्द – एअर इंडिया
“07 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली ते तेल अवीवसाठी एअर इंडियाचे उड्डाण आणि तेल अवीव ते दिल्लीचे परतीचे उड्डाण AI140 प्रवासी आणि क्रू मेंबर यांच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे”, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. लुफ्थांसा, स्विस एअर आणि तुर्की एअरलाइन्ससह इतर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनांनी देखील फ्लाइट रद्द करण्याची घोषणा केली आहे. (Israel-Palestine Conflict)
मेघालयातील 27 ख्रिश्चन यात्रेकरू आणि नेपाळमधील 7 लोक इस्रायलमध्ये अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील परिस्थिती चिघळली आहे. इस्रायलने दहशतवादाच्या विरोधात आता युद्धच पुकारले आहे. त्यासाठी नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले जात आहेत. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय दूतावास विद्यार्थांना तत्परतेने मदत करत आहेत. तेथील विद्यार्थ्यांचे व्हिडिओ समोर येत असून विद्यार्थ्यांनी ते सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. (Israel-Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community