हमास आणि इस्त्रायलच्या युद्धाला (Israel Palestine Conflict) एक आठवडा झाला, मात्र युद्ध सुरूच आहे. इस्त्रायली सुरक्षा दलांनी काल रात्रीपासून गाझा पट्टीत हवाई आणि जमिनीवरून हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा वरिष्ठ कमांडर (hamas air force commander) मारला गेल्याचा दावा इस्त्रायलने शनिवारी केला आहे.
(हेही पहा – Israel-Palestine Conflict : सौदी अरेबियाने इस्रायलसोबतची चर्चा थांबवली; युद्धाचा परिणाम )
गाझा पट्टीत काल रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा प्रमुख मुराद अबू मुराद याला ठार केल्याचा दावा इस्त्रायली सुरक्षा दलांनी केला आहे. या हल्ल्यात हमासचे हवाई मुख्यालयही उदध्वस्त झाले असल्याचे सांगण्यात आले. इस्त्रायली हवाई दलाने ‘एक्स’ या सोशल मिडियावर याबाबत पोस्ट केली आहे.
आयएएफच्या लढाऊ विमानांनी काल रात्री गाझा पट्टीवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. यामध्ये हमासचे अनेक अड्डे नष्ट करण्यात आले तसेच हमासचा गाझा पट्टीतील मुख्य गट नुख्बावरही हल्ले केले, असे सोशल मिडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.
हेही पहा –