इस्त्रायलमध्ये शनिवारी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत सर्व सुरळीत सुरू होते. वीकेंड आणि सकाळची वेळ असल्याने लोक आरामात दिवसाची सुरुवात करण्याच्या तयारीत असतानाच वातावरणात बंदुकीच्या गोळ्यांच्या धूर पसरला. रस्त्यावर सायरनचे भयंकर आवाज ऐकू येऊ लागले. पॅलेस्टाईनच्या दहशतवादी संघटना हमासने अवघ्या २० मिनिटांत इस्त्रायलवर ५ हजार रॉकेटने हल्ला केला. (Israel-Palestine War) या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला. हमासच्या या हल्ल्यानंतर इस्त्रायलने युद्ध जाहीर केले आहे. इस्त्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅबिनेट बैठक बोलावून युद्ध घोषित केले.
इस्त्रायल संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही ‘आयरन स्वॉर्ड्स’ शुरू किया है. याद्वारे हवा, जमीन आणि समुद्रावर रॉकेटचा मारा केला. याशिवाय उद्या म्हणजे रविवारी इस्त्रायलने शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. नेतन्याहू म्हणाले की, आम्ही युद्धात आहोत, कोणत्याही ऑपरेशनमध्ये नाही. आज सकाळी हमासने इस्रायल आणि तेथील नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला. शत्रुला याची किंमत चुकवावी लागेल आणि आम्ही जिंकू.
(हेही वाचा – ISRO : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागृत होण्याची शक्यता नाही, इस्त्रोच्या माजी अध्यक्षांनी व्यक्त केले मत )
ते पुढे म्हणाले की, मी माझ्या सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना फोन केला आणि हमासला माहिती पाठवली. हमासचे तळ उद्धस्त करण्याचे आदेश दिले आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर तोफखाना जमा करण्याचेही आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community