Israel -Palestine Conflict : इस्रायली नागरिकांनी ठेवला जगासमोर आदर्श; ‘हा’ व्हिडिओ होत आहे व्हायरल

ज्याप्रमाणे हमासने केलेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या इस्रायली नागरिकांचे व्हिडिओ समोर आले, त्याचप्रमाणे आता तेथील मदतकार्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. हमासच्या आतंकवादी हल्ल्यात इस्रायलची २० गावे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. ती गावे पुन्हा उभी करणे, तेथील नागरिकांच्या प्राथमिक गरजा तरी पूर्ण करणे, हे काम आता इस्रायलच्या उर्वरित नागरिकांनी शिरावर घेतले आहे.

143
Israel -Palestine Conflict : इस्रायली नागरिकांनी ठेवला जगासमोर आदर्श; 'हा' व्हिडिओ होत आहे व्हायरल
Israel -Palestine Conflict : इस्रायली नागरिकांनी ठेवला जगासमोर आदर्श; 'हा' व्हिडिओ होत आहे व्हायरल

इस्रायलची शिस्त आणि सुशासन यांचे कौतुक जगभरात केले जाते. (Israel -Palestine Conflict) आता हमासने केलेल्या हल्ल्यांनंतर इस्रायल पुन्हा उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे हमासने केलेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या इस्रायली नागरिकांचे व्हिडिओ समोर आले, त्याचप्रमाणे आता तेथील मदतकार्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. हमासच्या आतंकवादी हल्ल्यात इस्रायलची २० गावे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. ती गावे पुन्हा उभी करणे, तेथील नागरिकांच्या प्राथमिक गरजा तरी पूर्ण करणे, हे काम आता इस्रायलच्या उर्वरित नागरिकांनी शिरावर घेतले आहे. सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये इस्रायली नागरिकाने तेथे मदतकार्य कशा प्रकारे चालू आहे, याविषयी सांगितले आहे. (Israel -Palestine Conflict)

(हेही वाचा – US Employment Card : ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांना दिलासा, अमेरिका ५ वर्षांचं रोजगार कार्ड जारी करणार)

असे चालू आहे मदतकार्य
  • मोठ्या परिसरात देशभरातून अनेक ट्रक भरून आलेले साहित्य उतरवण्याचे काम चालू आहे.
  • तेथील सभागृहात पहिल्या टप्प्यात कपडे, लहान मुलांची खेळणी, लहान मुलांचे डायपर, लहान मुलांचे खाद्यपदार्थ, चप्पल, बूट, अंथरूणे, इलेक्ट्रोनिक वस्तू अशा अनेक वस्तू नागरिकांनी हल्ल्यात सर्वस्व गमावलेल्यांसाठी पाठवल्या आहेत. त्या वस्तूंचे वर्गीकरण करून खोक्यांमध्ये भरण्याचे काम चालू आहे.
  • दुसऱ्या टप्प्यात त्या वस्तू गरजेनुसार आणि ज्या ठिकाणी पाठवायच्या आहेत, त्यानुसार विभागल्या जात आहेत. शेकडो नागरिक या कार्यात सहभागी झाले आहेत.
  • तिथे एक समन्वय सेंटरही स्थापन करण्यात आले आहे. त्या कक्षाद्वारे हरवलेल्या शेकडो नागरिकांना शोधण्याचे काम चालू आहे. (Israel -Palestine Conflict)

तुम्ही चुकीचा शत्रू निवडला आहे ! – इस्रायली नागरिकाची विजिगिषु वृत्ती

या व्हिडिओच्या शेवटी त्या नागरिकाने हमासलाही सुनावले आहे, तुम्ही चुकीचा शत्रू निवडला आहे. हमास आतंकवादी आता एक तर मारले जातील किंवा कारागृहात असतील. जोपर्यंत आमचा एक एक नागरिक सापडत नाही, तोपर्यंत आम्ही गाझामध्ये एका एका इमारतीत जाऊन आतंकवाद्यांचा शोध घेऊ. तुम्ही केवळ एका देशाविरुद्ध युद्ध पुकारलेले नाही, तर या देशाच्या एक एक नागरिकाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारले आहे.  (Israel -Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.