Israeli-Palestinian conflict : गाझापट्टीत १९८ जणांचा मृत्यू; आता इस्त्रायलच्या हल्ल्याने पॅलेस्टिन हादरले

200

पॅलेस्टिनमधील गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करून युद्धात तोंड फोडले. Israeli-Palestinian conflict नंतर काही तासांतच इस्रायलचे पंतप्रधान यांनी आम्ही युद्ध घोषित करत आहोत, असे सांगत पॅलेस्टिनवर हल्ला सुरु केला. या हल्ल्यात गाझा पट्ट्यातील १९८ जणांचा मृत्यू झाला, तर १६०० जण जखमी झाले. इस्त्रायलच्या हल्ल्यात ४० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान इस्रायलच्या हल्ल्यामुळे आता मुस्लिम राष्ट्रांचे पॅलेस्टिनींच्या बाजूने झुकते माप येऊ लागले आहे. यात कतर आणि सौदी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही दिवसांत सौदी हा इस्रायलसोबत मैत्री करणार होता. मात्र आता सौदीने इस्रायलच्या विरोधात मतप्रदर्शन केले आहे. गाझा पट्टीतील स्थितीवर आम्ही चिंता व्यक्त करतो. तणाव संपवून शांतता राखण्याचे आवाहन करत आहे. इस्रायलकडून अधिकारांच्या उल्लंघनामुळे सध्याचा तणाव वाढला आहे. यामध्ये पॅलेस्टिनी लोकांचा छळ असून  इस्रायल पोलिसांची वारंवार छापेमारी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला वैधानिक पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कायद्याचे कठोर नियम लादले जावेत. पॅलेस्टिनी लोकांच्या ऐतिहासिक अधिकारांचा आदर करण्यासाठी इस्रायलला सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा Israel-Philistine War : इस्त्रायलला भारताकडून मिळाला पाठिंबा, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.