हमासचा उपसेनापती आणि अल-कासिम ब्रिगेडचा कमांडर सालेह अल-अरोरी (Saleh Al Arouri) बैरूतमधील ड्रोन हल्ल्यात मारला गेला. (Israel–Hamas War) हमासने याला दुजोरा दिला आहे. इस्रायलने सालेहची हत्या केल्याचा दावा लेबेनॉनच्या पंतप्रधानांनी केला आहे. ही घटना लेबनॉनला (Lebanon) युद्धात ओढण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Jammu and Kashmir : स्थानिक गुप्तचरांचे जाळे आणखी मजबूत करा; अमित शहा यांनी घेतला जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा)
हमासला हिजबुल्लाहचा पाठिंबा
हमास (Hamas) आणि इस्रायल (Israel) यांच्यात युद्ध चालू होऊन तीन महिने झाले आहेत. इस्रायली सैन्य गाझा पट्टीत प्रत्यक्ष मोहिमा राबवत आहे. हमासला लेबनॉनच्या हिजबुल्लाह (Hezbollah) या दहशतवादी गटाचा देखील पाठिंबा आहे. हिजबुल्लाहचे प्रमुख नेते तेथे आश्रय घेतात.
अमेरिकेने जाहीर केले होते 50 लाख डॉलर्सचे बक्षीस
हमासने अल-अक्सा रेडिओवर (Al-Aqsa Radio) अरोरीच्या मृत्यूची पुष्टी केली. “हमास पॉलिट ब्युरोचे (hamas politburo) सदस्य इज्जात अल-शार्क यांनी याला ‘भ्याड हत्या’, असे म्हटले आहे. सालेह अल-अरोरी हे हमासच्या पॉलिट ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी आणि कासिम ब्रिगेड या त्याच्या लष्करी शाखेच्या संस्थापकांपैकी एक होते. त्याच तुकडीने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला. गेल्या वर्षी अमेरिकेने अरुरीला 50 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते.
(हेही वाचा – Raju Shetti : ‘स्वाभिमानी’ राजू शेट्टींची महाविकास आघाडीशी कट्टी कायम)
२ जानेवारीच्या रात्री केला हल्ला
इस्रायली (Israel) ड्रोनने मंगळवार, २ जानेवारीच्या रात्री दहियाह येथील हमासच्या कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात एकूण ६ लोक ठार झाले. यात सालेह अल-अरोरी (Saleh Al Arouri) यांच्यासह इतरांचा समावेश आहे, ज्यात डॉक्टरांचा समावेश आहे, ज्यांची ओळख पटलेली नाही.
दहिया हा हमासचा मित्र असलेल्या हिजबुल्लाहचा बालेकिल्ला आहे. ऑक्टोबरमध्ये हमाससोबत युद्ध सुरु झाल्यापासून इस्रायल लेबनॉनच्या दक्षिण सीमेवरील हिजबुल्लाहच्या तळांवर दररोज गोळीबार करत आहे. (Israel–Hamas War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community