ISRO: पहिलं भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचं इस्रोचं उद्दिष्ट, २०२८ पर्यंत साकारणार पहिली आवृत्ती

इस्रोने आगामी ५ वर्षांत म्हणजे २०२८पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची पहिली आवृत्ती तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे स्थानक लॉंच करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन लॉंच व्हेइकलची (एनजीएलव्ही) आवश्यकता असेल.

197
ISRO: पहिलं भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचं इस्रोचं उद्दिष्ट, २०२८ पर्यंत साकारणार पहिली आवृत्ती
ISRO: पहिलं भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचं इस्रोचं उद्दिष्ट, २०२८ पर्यंत साकारणार पहिली आवृत्ती

आपल्या सध्याच्या तंत्रज्ञान क्षमतांचा वापर करून २०२८ पर्यंत अंतराळात स्वतंत्रपणे भारतीय अवकाश स्थानक तयार करण्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं उद्दिष्ट आहे अशी माहिती इस्रोचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली.  गुरुवारी व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक या विषयावरील परिसंवादाला संबोधित करताना बोलत होते. भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचं भारताचं पहिलं पाऊल हे आर्थिक विकास, वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन आणि अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असंही सोमनाथ यांनी सांगितलं.

इस्रोने भारताचा स्पेस रोडमॅप-२०४७ तयार केला आहे. इस्रोने आगामी ५ वर्षांत म्हणजे २०२८पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची पहिली आवृत्ती तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे स्थानक लॉंच करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन लॉंच व्हेइकलची (एनजीएलव्ही) आवश्यकता असेल. ती २०३४पर्यंत विकसित होण्याची शक्यता आहे. म्हणजे भारत २०३५ पर्यंत आपल्याच रॉकेटद्वारे अंतराळात आपले अंतराळ स्थानक पाठवू शकेल.

(हेही वाचा – Ayodhya-Ahmedabad Air Service : ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अयोध्या-अहमदाबाद विमानसेवेची सुरुवात)

२०४७ पर्यंत अनेक चांद्रयान मोहिमा
रोडमॅपनुसार, इस्रो २०४७ पर्यंत अनेक चांद्रयान मोहिमादेखील लॉंच करेल. त्यामध्ये भारतीयांना चंद्रावर उतरवण्यापासून ते पृथ्वीच्या कक्षेपासून चंद्रपर्यंतच्या पर्यटनाचा समावेश आहे. स्पेस रोडमॅप -२०४७नुसार, चांद्रयान मोहिमा तीन टप्प्यांत होतील. पहिल्या टप्प्यात २०२८पर्यंत चांद्रयान-४ लॉंच करण्याची तयारी आहे. ही चंद्रावरून नमुना परतीची मोहीम असेल. दुसऱ्या टप्प्यात चांद्रयान-५,६ आणि ७ लॉंच करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मानवाला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी विकसित करणाऱ्या मोहिमा असतील. चांद्रयान -५मध्ये चंद्रावर रेडिओआयसोटोप्स हीटर लावले जातील. जेणेकरून मानवाला थंड वातावरणातही उष्णता मिळू शकेल. चांद्रयान-६मध्ये चंद्रावर मानवी वसाहतीसाठी पायाभूत संरचना तयार करण्याची योजना आहे. चांद्रयान-७मध्ये भारतीयांना चंद्रावर पाठवले जाईल. यानंतर चांद्र पर्यटन सुरू होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.