चंद्रयान -३ मोहीम मुळे संपूर्ण जगभरात इस्रोच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल कौतुक होत आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. याच वेळी पंतप्रधान मोदींनी चंद्रयान -३ महा क्विज’ (Chandrayaan-3 Maha Quiz) ची घोषणा केली होती. यामध्ये आतापर्यंत तब्बल १२लाख स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे.
१ सप्टेंबरपासून ही प्रश्नमंजूषा स्पर्धा सुरू झाली आहे. तुम्हीही यामध्ये सहभाग नोंदवू शकता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपये बक्षीस मिळणार आहेत. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला अनुक्रमे ७५००० आणि ५०००० रुपये बक्षीस मिळेल.या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकानंतर पुढील १०० स्पर्धकांना २००० रुपये बक्षीस मिळेल. तर त्यापुढील २०० स्पर्धकांना १०००रुपये बक्षीस मिळणार आहे. यासोबतच, प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना एक सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.
(हेही वाचा : Ram Mandir : राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर चढवला जाणार सोन्याचा थर, जाणून घ्या काय आहे खास)
इस्रो आणि भारत सरकारने ही प्रश्नमंजूषा स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये स्पर्धकांना ३०० सेकंदांमध्ये १० प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. हे प्रश्न चंद्रयान -३ मोहीम आणि चंद्राबाबत असतील. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.
असा घ्याल सहभाग
या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्वप्रथम isroquiz.mygov.in या वेबसाईटवर जाऊन आपला सहभाग नोंदविला आहे.
हेही पहा –