भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) (ISRO) २०२५ पर्यंत स्वदेशी अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी देशाला पुनर्वापरासाठी योग्य असे रॉकेट हवे आहे. ते खर्चिक नसावे आणि जास्त वजनीही नसावे. या रॉकेटचे इंजिन भारताने बनवले आहे. त्याच्या १५० चाचण्याही पार पडल्या. रॉकेटचा ढाचा जवळपास तयार आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये ते झेपावेल.
१९६९ पासून भारत रॉकेट बनवत आहे. पुनर्वापर तंत्रज्ञानात देशाला अद्यापही यश मिळालेले नाही; परंतु देश आता या तंत्राच्या जवळ पोहोचला आहे. या वेळी यश मिळाल्यास हे पहिले रियुझेबल रॉकेट ठरेल. अमेरिकन कंपनी स्पेस एक्सकडे असेच हेवी रॉकेट आहे. भारताचे रॉकेट ६०० ते ८०० कोटी रुपयांत तयार होईल; परंतु एकच रॉकेट २५ वेळा उड्डाण करू शकेल. म्हणजे रॉकेट २५ वेळा अंतराळात जाऊन उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करून पृथ्वीवर परतेल. एकदा निर्मिती झाल्यानंतर उड्डाणाचा प्रत्येकी खर्च २४ कोटीवर येईल. भारत ३ प्रकारचे रॉकेट तयार करत आहे. पहिला – रियुजेबल साउंडिंग रॉकेट (आरएसआर), दुसरे- एसआरएलव्ही व तिसरे-एमआरएलव्ही रॉकेट. तिन्हींचा वापर लहान उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community