इस्रोची (ISRO) चांद्रयान -३ (Chandrayaan-3) मोहीम जगभरात ऐतिहासिक कामगिरी करणारी ठरली आहे. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रृवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या कामगिरीबद्दल इस्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये आता अजून एका सन्मानाची भर पडली आहे. (ISRO)
अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जणारा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रोला मिळाला आहे. ‘चांद्रयान-३’ मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला देण्यात आला आहे. (ISRO)
Another accolade for 🇮🇳 Chandrayaan-3!
On behalf of @ISRO, Cd’A Sripriya Ranganathan @ranganathan_sr received the prestigious @AviationWeek Laureates Award which recognizes extraordinary achievements in aerospace industry. The award noted #Chandrayaan-3’s landing at the lunar… pic.twitter.com/l1OJj2JfUw
— India in USA (@IndianEmbassyUS) March 18, 2024
इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी चांद्रयान -३ची मोहीम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रृवाजवळ पोहोचणारा हा पहिला देश ठरला, असं अधिकृत अॅवॉर्ड घोषणेत म्हटलं आहे. (ISRO)
यावेळी असे सांगण्यात आले की, ‘अवघ्या ७५ मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहितीदेखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे.’ इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रीया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. (ISRO)
हेही पहा –