भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नवीन वर्षात ‘कृष्णविवरांचा अभ्यास’ (Black holes) करण्यासाठी XPoSat Mission साठी सज्ज झाले आहे. या अभ्यासासाठी PSLV-C58 रॉकेटच्या माध्यमातून “एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह मिशन”चे सोमवारी, १ जानेवारीला प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत ‘x’अकाउंटवरून दिली आहे.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सोमवारी, १ जानेवाली २०२४ला सकाळी ९.१० वाजता PSLV-C58चे प्रक्षेपण होईल. यामध्ये पीएसएलव्ही सी ५८सह एक्से पोलरीमेट्री सॅटेलाईट (एक्स्पो सॅट) पाठवले जाणार आहे. हा उपग्रह कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करेल.
(हेही वाचा – )
🚀 PSLV-C58/ 🛰️ XPoSat Mission:
The launch of the X-Ray Polarimeter Satellite (XPoSat) is set for January 1, 2024, at 09:10 Hrs. IST from the first launch-pad, SDSC-SHAR, Sriharikota.https://t.co/gWMWX8N6IvThe launch can be viewed LIVE
from 08:40 Hrs. IST on
YouTube:… pic.twitter.com/g4tUArJ0Ea— ISRO (@isro) December 31, 2023
जगातील दुसरे ध्रृवीय मिशन
एक्स्पो सॅट ही आदित्य एल १ आणि अॅस्ट्रो सेटनंतर अंतराळात स्थापन होणारी तिसरी वेधशाळा असेल. २०२१मध्ये लॉंच केलेल्या “नासा”च्या इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोररनंतर हे भारताचे पहिले आणि जगातील दुसरे ध्रृवीय मिशन आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.
इस्रो करणार तेजस्वी ताऱ्यांचा अभ्यास
विश्वातील ५० तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये पल्सर, ब्लॅक होल, एक्स-रे बायनरी, सक्रीय गॅलेक्टिक न्यूक्ली, न्यूट्रॉन तारे आणि थर्मल नसलेल्या सुपरनोव्हाचे अवशेष समाविष्ट आहेत. हा उपग्रह ५००-७०० किमीच्या कमी पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community