समुद्रकाठची शहरे बुडणार; इस्रोचा अहवाल काय सांगतो?

सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्यामुळे त्याचा परिणाम भौगोलिक परिस्थितीवर होणार आहे, यात समुद्रकाठच्या शहरांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होणार आहे, असे इस्रोच्या अहवालात म्हटले आहे.

कोणता भूभाग पाण्याखाली जाणार 

वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, बदलत्या वातावरणामुळे हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर याविषयी पावले उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तापमानातही वाढ झाली. जेव्हा माणूस निसर्गाच्या कामात अडथळा आणतो, तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात होत असते. डोंगरावर वसलेला जोशीमठ, नैनिताल, शिमला, चंपावत किंवा उत्तरकाशी हीच नाही, तर समुद्राच्या काठावर वसलेली शहरेही बुडण्याची शक्यता आहे. इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने (ISRO Space Application Centre) एक संशोधन अहवाल जारी केला आहे. अहमदाबादसह गुजरातचे अनेक किनारी भाग समुद्राच्या धूपीमुळे बुडतील, असे म्हटले आहे.

(हेही वाचा इथोपियाचा हायले लेमी ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजेता)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here