भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचे असलेल्या स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी इस्रोने उपयोगात आणलेले दोन उपग्रह एकमेकांपासून विलग होऊन सोमवारी आपापल्या कक्षेत स्थिरावले असून प्रारंभीचे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले.
दोन उपग्रहांना अंतराळात एकमेकांशी जोडण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी इस्रोने सोमवार, ३० डिसेंबर रोजी मोठी कामगिरी बजावली आहे. स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचे आहे. त्याची चाचणी करण्यासाठी इस्रोने उपयोगात आणलेले दोन उपग्रह एकमेकांपासून विलग होऊन सोमवारी आपापल्या कक्षेत स्थिरावले असून, प्रारंभीचे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
(हेही वाचा – सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; पणनमंत्री Jayakumar Rawal यांची घोषणा)
पीएसएलव्ही सी-६० (PSLV C-60) या प्रक्षेपकाने दोन महत्त्वाच्या उपग्रहांसह आणखी काही उपग्रह नेले होते. ते भूपृष्ठापासून ४७५ किमी उंचीवर नियोजित कक्षेत स्थिरावले. या उपग्रहांची स्पेस डॉकिंग प्रक्रिया येत्या काही दिवसांनंतर म्हणजे ७ जानेवारीला पार पडू शकते. स्पेस डॉकिंग एक्सपिरिमेंटसाठी (Space Docking Experiment, स्पाडेक्स) हे दोन उपग्रह जोडले जाणार आहेत.
श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून १०० वे प्रक्षेपण होण्यासाठी जानेवारीमध्ये नियोजित जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल मिशनसह (Geosynchronous Launch Vehicle Mission) महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी इस्रो तयारी करत आहे, असे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.
याही क्षेत्रात भारत होणार आत्मनिर्भर
स्पेस डॉकिंग प्रयोगासाठी दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करणे ही प्रक्रिया देखील भारताने प्रथमच पार पाडली आहे. त्यासाठी एसडीएक्स०१ (चेझर), एसडीएक्स०२ हे दोन उपग्रह तयार करण्यात आले. त्यांचे वजन प्रत्येकी २२० किलोचे असून, ते अनंत टेक्नॉलॉजिज लिमिटेड या कंपनीने इस्रोसाठी बनविले. या उपग्रहांची चाचणी एटीएलच्या प्रयोगशाळेत पार पाडल्या जातात. यामुळे स्पेस डॉकिंगबाबत भारत आत्मनिर्भर होइल.
स्पाडेक्स मोहीम अतिशय आवश्यक – एस. सोमनाथ
जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल (जीएसएलव्ही) मोहिमेसंदर्भात आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून जानेवारीमध्ये प्रक्षेपकाचे १००वे प्रक्षेपण होणार आहे. प्रक्षेपकाने आपल्या ९९व्या उड्डाणात दोन उपग्रहांचे स्पेस डॉकिंगसाठी अवकाशात प्रक्षेपण केले. अंतराळ क्षेत्रातील प्रगत संशोधनासाठी स्पाडेक्स मोहीम अतिशय आवश्यक आहे. मानवाला अंतराळात घेऊन जाणे, अवकाश स्थानक बांधणे अशा भारताच्या आगामी प्रकल्पात स्पेस डॉकिंग हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community