भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आगामी 4 डिसेंबर रोजी युरोपीयन स्पेस एजन्सीच्या (इएसए) प्रोबा-3 या मिशनचे प्रक्षेपण करणार आहे. या मिशनसाठी आवश्यक असणारी अचुकता १ मिलिमीटरची आहे. १ मिलीमीटर म्हणजे फार फार तर आपल्या नखाची जाडी. इतक्या अचुकतेने या मिशनमधील दोन्ही स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत ठेवायची आहेत.
सूर्याच्या बाह्य बाजूने अस्पष्ट असे वातावरण आहे, त्याला कोरोना असे नाव आहे. कोरोनाचा अभ्यास सध्या फक्त सूर्यग्रहण असलेल्या दिवशीच होऊ शकते. पण प्रोबा-3 या मिशनची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मिशनमधील एका स्पेसक्राफ्टची सावली दुसऱ्यावर पडणार आहे, म्हणजेच कृत्रिम ग्रहणाची स्थिती निर्माण होईल. (ISRO)
(हेही वाचा – वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या खासदार Arvind Sawant यांच्यावर गुन्हा दाखल)
त्यामुळे प्रोबा-3 मिशन सूर्याच्या भोवतीच्या वातावरणाचा अभ्यास अव्याहतपणे करू शकणार आहे. पण ही स्थिती साध्य करण्यासाठी हे स्पेसक्राफ्ट अत्यंत अचूकरीत्या पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत ठेवायचे आहेत. ही अचुकता फक्त 1 मिलीमीटरची आहे. बेल्जियम येथील रेडवायर स्पेस येथे हे दोन स्पेसक्राफ्ट बनवण्यात आले आहेत. ते आता भारतात पाठवण्यात येत आहेत. (ISRO)
अवकाश संशोधनात यापूर्वी कधीही न घडलेला चमत्कार हे स्पेसक्राफ्ट करतील, त्यामुळे यांच्या निर्मितीसाठी बराच कलावधी लागला, असे युरोपीयन स्पेस एजन्सनी म्हटले आहे. या स्पेसक्राफ्टच्या बॅटरीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या. इस्रोच्या पीएसएलव्ही-एक्सएल या लाँच व्हेइकलमधून या स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण होणार आहे. पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत हे स्पेसक्राफ्ट कार्यरत राहतील. (ISRO)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community