फेरीवाल्यांच्या मुद्द्याचा ‘विनोद’ केला आहे; Bombay High Court ने सरकार, महापालिकेला फटकारले

144
फेरीवाल्यांच्या मुद्द्याचा ‘विनोद’ केला आहे; Bombay High Court ने सरकार, महापालिकेला फटकारले
फेरीवाल्यांच्या मुद्द्याचा ‘विनोद’ केला आहे; Bombay High Court ने सरकार, महापालिकेला फटकारले

पालिका आणि राज्य सरकारने अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा ‘विनोद’ केला आहे. सरकारला वाटले, तर ते एका रात्रीत वटहुकूम काढू शकतात. ते एका रात्रीत समिती स्थापन करू शकतात; पण राज्य सरकार पालिकेवर आरोप करण्यात धन्यता मानत आहे. समिती स्थापन करण्याऐवजी सरकार आणि पालिका कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत, परस्परांवर आरोप करत आहेत. अधिकारी समन्वय साधत नाहीत, त्याऐवजी एकमेकांवर आरोप करतात. आता हा विनोदाचा भाग झाला आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सरकार आणि महापालिकेला (Brihanmumbai Municipal Corporation) सुनावले आहे.

(हेही वाचा – रेल्वेच्या पुणे विभागाचे विषय लवकरच मार्गी लागणार; Murlidhar Mohol आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये सविस्तर चर्चा)

एक दशक उलटूनही टाऊन व्हेंडिंग कमिटी स्थापण्यास राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दोन्हींवर कठोर ताशेरे ओढले. अनधिकृत फेरीवाले (Unauthorised hawkers), विक्रते यांच्यावर अंकुश बसावा, यासाठी स्ट्रीट व्हेंडर्स कायदा २०१४ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्यात टाऊन व्हेंडिंग कमिटी (टीडब्ल्यूसी) स्थापन करण्याची तरतूद आहे. ही समिती फेरीवाले, विक्रेत्यांना परवाना देईल. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांची ओळख पटेल, असे न्या. एम.एस. सोनक आणि न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने म्हटले. कायदा अस्तित्वात आल्यानंतर सहा महिन्यांत समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे; पण एक दशक उलटूनही समिती अस्तित्वात आलेली नाही, असा संताप न्यायालयाने व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २ सप्टेंबरला होणार आहे.

या प्रश्नासाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे, असे नमूद करत उच्च न्यायालयाने नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रश्नात व्यक्तिगतरीत्या लक्ष घालण्याचे आदेश दिले. ऑगस्ट अखेरपर्यंत टीडब्ल्यूसी निवडून येईल आणि सप्टेंबरपर्यंत फेरीवाल्यांसदर्भात धोरण आखण्यात येईल. प्रधान सचिव तसे करण्यात अपयशी ठरले तर हे प्रकरण कठोरपणे हाताळण्यात येईल. प्रश्नांचा पाढा वाचणे, दुसऱ्याला दोष देण्याची वृत्ती वाढली आहे. कायद्याचे पालन करणे सरकारचे कर्तव्य आहे. धोरण आखण्यास विलंब नको. प्रशासकीय उदासीनता, समन्वयाचा अभाव आदी छोट्या गोष्टींसाठी आम्ही इथे बसलेलो नाही. तुम्हाला असे वाटते की, आम्ही प्रशासकीय कामात लुडबुड करतो. प्रशासन जेव्हा हातावर हात धरून बसते, तेव्हा आम्हाला काहीतरी करावे लागते. आम्ही यातून कधीही आमचे हात झटकणार नाही, अशी टीप्पणी न्यायालयाने केली आहे.

लोकांनी मुक्याने त्रास सोसावा का ?

सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती कमल खटा यांनी म्हटले आहे की, शहरातील प्रत्येक व्यक्ती त्रासली आहे. मग ते नागरिक असून, देत किंवा फेरीवाले. प्रत्येक जण त्रास सहन करत आहे. त्यांना तुम्ही (महापालिका) काय उत्तर देणार? न्यायालयाचे आदेश, कायदे सर्व आहे; पण अंमलबजावणी नाही. लोकांनी तक्रार न करता त्रास सहन करावा, अशी अपेक्षा करता का? (Bombay High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.