Ganesh Festival : गणेशोत्सवाचे पावित्र्य जपणे सर्वांची जबाबदारी आहे; अभिनेते मिलिंद गवळी यांचे आवाहन

180
Ganesh Festival : गणेशोत्सवाचे पावित्र्य जपणे सर्वांची जबाबदारी आहे; अभिनेते मिलिंद गवळी यांचे आवाहन
Ganesh Festival : गणेशोत्सवाचे पावित्र्य जपणे सर्वांची जबाबदारी आहे; अभिनेते मिलिंद गवळी यांचे आवाहन

माझे वडील पोलीस अधिकारी होते. त्यामुळे सणासुदीला ते घरी नसायचे. (Ganesh Festival) अशा वेळी मला फार वाईट वाटायचे. जिथे गर्दी जास्त असेल किंवा पोलिसांची गरज असेल, तिथे त्यांना वेळेत हजर राहावे लागायचे. गणपतीच्या दिवसांमध्ये त्यांना रात्रभर ड्युटी असायची. अशा वेळी त्यांच्या पायाला सूज यायची, अशा शब्दांत अभिनेते मिलिंद गवळी यांनी गणेशोत्सव काळात पोलीस दलावर येणारा ताण आणि गणेशोत्सवाचा हरवत चाललेला उद्देश याविषयी खंत व्यक्त केली. ‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत मिलिंद गवळी अनिरुद्धची भूमिका साकारतात. अलीकडेच या मालिकेतील सर्व कलाकारांनी स्ट्रार प्रवाहच्या गणेशोत्सव कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी मिलिंद गवळी यांनी गणपती बाप्पाची पूजा आणि मराठी सणांचे पावित्र्य राखणे किती गरजेचे आहे, याविषयी आपले मत मांडले.

(हेही वाचा – Government Service Recruitment : शासकीय सेवेत १३८ अधिकारी-कर्मचारी यांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार )

गणेशोत्सवाचा मूळ उद्देश अजूनही काही लोकांना माहितीच नाही

अभिनेते मिलिंद गवळी पुढे म्हणाले, ”माझ्या वडिलांचे विशेषत: गणपती विसर्जनाच्या वेळी हाल व्हायचे. (Ganesh Festival) आपल्या इथे या गोष्टी आता कमी झाल्या असतील, तर मला कल्पना नाही; परंतु आधी मुलं दारु वगैरे पिऊन दंगा-मस्ती करायचे. आजही मी नेहमी लोकांना सांगतो की, गणपती आणणे ही खूप पवित्र गोष्ट असते. टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाचा मूळ उद्देश अजूनही काही लोकांना माहितीच नाही. फक्त ८ ते १० दिवस सुट्टी असते आणि आपल्या इथे मंडप असतो; म्हणून तिथे पत्ते खेळायचे या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. काही भागांत आता यामध्ये बराच बदल झाला आहे.”“तुमच्या परिसरात अशा गोष्टी होत असतील, तर त्या बंद करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे. गणेशोत्सवाचे पावित्र्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” असे मिलिंद गवळी यांनी सांगितले. (Ganesh Festival)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.