खासगी कंपन्यांनी आपल्याकडे असलेल्या रिक्त जागांची माहिती कौशल्य विकास विभागाच्या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक केले जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.
राज्यात बेरोजगारी वाढत असून, शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळत नसल्याबाबतचा प्रश्न काॅंग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री लोढा यांनी ही माहिती दिली.
( हेही वाचा: खुशखबर! दिवळीत मुंबईतील म्हाडाच्या 4 हजार घरांची लाॅटरी; लवकरच घोषणा )
नोकरीच्या उपलब्धतेची माहिती मिळावी म्हणून कौशल्य विकास विभागाने वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार तरुण आपली नोंदणी करतात. तसेच, खासगी कंपन्या आपल्याकडील रिक्त जागांची माहिती या पोर्टलवकर देत नसल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी सरकारकडून मोहमही राबवण्यात आली. मात्र, तरीही खासगी कंपन्यांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता खासगी कंपन्यांना या पोर्टसलवर नोंदणी करुन आपल्याकडील रिक्त जागांची माहिती देणे बंधनकारक केले जाईल, असे लोढा यांनी विधानपरिषदेत सांगितले.
Join Our WhatsApp Community