कोर्टाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये चालवण्याचा विचार व्हावा – Neelam Gorhe

48

मागील काही काळात घडलेल्या महिला आणि बालकांवरील (child) अत्याचाराच्या घटना, त्यानंतर सर्वसामान्यांचा प्रक्षोभ, आरोपींना तत्काळ फाशी देण्याची वाढती मागणी, यामुळे जनतेच्या अपेक्षा न्यायालयाकडून (Court) वाढल्या आहेत. न्यायालयीन प्रलंबित प्रकारणांमध्ये (pending cases) न्यायदानात विलंब (justice delayed) होत असल्याचा अनुभव अनेकांना आहे. त्यामुळे न्यायालयांचे कामकाज दिवसाच्या दोन सत्रांमध्ये म्हणजेच दोन पाळ्यांमध्ये चालवण्याच्या पर्यायावर विचार होणे गरजेचे आहे, असे मत राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

(हेही वाचा – Index Report: महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवाल प्रसिद्ध; पाहा तुमचा जिल्हा कोणत्या क्रमांकांवर आहे?)

पीडितांना न्याय मिळेल

सध्या विविध सत्र, दिवाणी न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत लाखो प्रकरणे प्रलंबित असून राज्याच्या वेगवेगळ्या तुरुंगात ७५ टक्केपेक्षा अधिक लोक आरोप सिध्द झालेले नसतानाही जामीनाच्या प्रतीक्षेत नरकयातना भोगत आहेत. त्याचप्रमाणे महिलांवरील (women) अत्याचाराच्या गुन्ह्यासंदर्भात अनेक प्रकरणे न्यायालयाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित राहतात. अशा प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर झाल्यास महिलांना (women) तसेच पीडित पाल्याच्या पालकांना न्याय मिळेल, या उद्देशाने न्यायालयाचे कामकाज दोन सत्रांमध्ये (two shifts) चालवण्याचा विचार व्हावा, असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

सरकारनेही पायाभूत सुविधा द्याव्यात

डॉ नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) पुढे म्हणाल्या की राज्य सरकारनेही न्यालालयांना यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे जेणेकरून न्यायालयाकडून प्रलंबित प्रकाराणांचा निपटारा जलद गतीने होऊ शकेल. डॉ गोऱ्हे यांनी मंत्रालयातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिकरित्या संवाद साधला.

(हेही वाचा – BMC : महापालिका आयुक्तांचा बोरीवलीत रस्ते पाहणीचा पर्यटन दौरा, त्या रस्त्यांकडे दुर्लक्षच!)

पिडित कुटुंबांशीही संपर्कात

कल्याण, राजगुरूनगर, लोणावळा या ठिकाणच्या संबंधित पोलीस अधिका-यांशी आपण स्वत: संपर्क साधून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पिडित कुटुंबांशीही आपण संपर्क साधून त्यांना आधार दिला असल्याचे डॉ.गो-हे यांनी सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.