राज ठाकरेंकडून बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘हे’ काव्य वाचून शिवरायांना आदरांजली

68
मराठी भाषा दिनी Raj Thackeray म्हणाले, मराठी भाषा नव्या पिढीसाठी टिकविणे आवश्यक
  • प्रतिनिधी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी ती टिकविण्यासाठी सतत प्रयत्न आवश्यक आहेत, अन्यथा ती पुढच्या पिढीला कळणार नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले. मनसेकडून मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी शिव चरित्रकार बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवरायांवरील ‘कोण रे तू, कोण तू’ हे काव्य वाचून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली.

“मराठी भाषा दिवस किंवा मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा, हे सरकारलाही माहीत नव्हते. २००८ साली मनसेने याची सुरूवात केली. मराठी भाषा टिकवण्यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली, विविध उपक्रम हाती घेतले. आता भाषा बदलत आहे, कवितेचे स्वरूपही बदलत आहे. पण जुन्या साहित्यिकांनी काय लिहून ठेवले आहे, हे नव्या पिढीला कळले पाहिजे, म्हणूनच आम्ही आज या दिग्गजांना कविता वाचनासाठी बोलावले आहे,” असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

भव्य पुस्तक प्रदर्शन आणि कवितांची मैफिल

संपूर्ण राज्यात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले असून त्याला २ मार्चपर्यंत भेट देता येईल. याशिवाय मराठी भाषेच्या सन्मानार्थ कवितांची एक विशेष मैफिलही रंगली.

(हेही वाचा – Waqf विधेयकातील १४ बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता)

राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित

या खास कार्यक्रमाला राज ठाकरे, गायिका आशा भोसले, अभिनेते अशोक सराफ, गीतकार जावेद अख्तर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, चित्रपट निर्माते नागराज मंजुळे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

या दिग्गजांनी आपल्या आवाजातून मराठी कवितांना नवा रंग दिला. कार्यक्रमाची सुरुवात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कविता वाचनाने झाली. त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथातील शिवाजी महाराजांवरील ‘कोण रे तू’ हे काव्य सादर केले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले.

(हेही वाचा – Jalgaon मध्ये 19 किलो गांजासह संशयित आरोपीला अटक)

पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

मराठी वाचनसंस्कृती वाढावी आणि नव्या पिढीला उत्तम साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मनसेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन २ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, सर्वांनी त्याला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.