पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न समजून घेण्यासाठी पाकिस्तानच्या दृष्टीने त्याची व्यवहार्यता समजून घेणे आवश्यक आहे. पाकिस्तान बनवले गेले, तेव्हा त्याच्या उत्पन्नाची साधनेही ठरवली जातात. पाकिस्तानच्या दृष्टीने विचार केला, तर त्याची स्वत:ची उत्पन्नाची साधने आहेत. पाकिस्तानकडे सुपीक जमीन आहे. गाय, म्हैस, बकरी असे चांगले पशूधन आहे. नैसर्गिक स्रोत चांगले आहेत. पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न समजून घेतांना त्याची भौगोलिक स्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे प्रा. लियाकत खान यांनी केले. ते ‘सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटर’ने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे झालेल्या ‘पाकिस्तान्स रेप ऑफ काश्मीर’ या कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम २१ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे पार पडला. या वेळी लियाकत खान यांनी विविध स्तरांवर पाकव्याप्त काश्मीर प्रश्नाची उकल केली.
(हेही वाचा – BJP : तरुणांची दिशाभूल करणाऱ्या उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी माफी मागावी – भाजपची मागणी)
पाकव्याप्त काश्मीरच्या प्रश्नाविषयी बोलताना लियाकत खान पुढे म्हणाले की, भारतासाठी तो प्रदेश का महत्त्वाचा आहे, हेही जाणून घेणे आवश्यक आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून ३ देशांच्या सीमा जातात. चीनचा झिनजियांग प्रांत, अफगाणिस्तान आणि भारत या ३ देशांच्या सीमा या प्रांताला लागून आहेत. तेल, गॅस या सगळ्याची वाहतूक करण्यासाठी हा प्रांत महत्त्वाचा आहे.
पाक आण्विक युद्धाच्या तयारीत
पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांसाठी काय करत आहे. पाक तेथील नगरिकाना आरब देशांत जाण्यासाठी व्हिसा सुलभतेने देत आहे. उद्या युद्ध झाले, तर पाकिस्तान त्याची अण्वस्त्रे कुठे ठेवणार ? त्यासाठी पाकिस्तानला POK का हवा आहे. पाकला राजनैतिक खोली नाही. तो आता त्याच्या नीती अफगाणिस्तानमध्ये तयार करत आहे.
G20 च्या तिसऱ्या दिवशी जेव्हा भारत, इस्राईलमध्ये आणि सौदी अरेबिया यांच्यात भारत-मध्य पूर्व-यूरोप कॉरिडॉर बनवण्याविषयी चर्चा चालू होती, तेव्हाच हमासचा हल्ला होणार हे ठरले होते. कारण त्यात इराणला दुर्लक्षित केले गेले होते, असे प्रा. लियाकत खान या वेळी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community