- ऋजुता लुकतुके
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासामुळे येणाऱ्या दिवसांत माहिती तंत्रज्ज्ञान क्षेत्र कसं बदलणार आहे हे सांगणारा एक अहवाल गार्टनर या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेनं प्रसिद्ध केला आहे. आणि त्यानुसार, २०१७ पर्यंत या क्षेत्रात कार्यरत ८० टक्के अभियंत्यांना नवीन कौशल्य शिकून घ्यावी लागणार आहेत. याचं कारण, सॉफ्टवेअर तयार करण्याची पद्धत आणि तंत्रही बदलतंय. या क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. त्यामुळे नवीन कौशल्य शिकण्यावाचून अभियंत्यांना पर्याय नसेल. (IT Jobs Future)
पण, या जमेची बाजू ही आहे की, एआय प्रणाली म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही स्वतंत्रपणे काम करत या क्षेत्रातील माणसांची गरजच कमी करेल, हा धोका मात्र माहिती तंत्रज्ज्ञान क्षेत्राला दिसत नाही. अजूनही अभियंत्यांची गरज लागणार आहे. फक्त त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोग्राम शिकून घ्यावे लागतील. ‘तुमचं ज्ज्ञान आणि सर्जनशीलता यांना कृत्रिम बुद्धिमत्ता मात देऊ शकत नाही. त्यामुळे माणसांची जागा नवं तंत्रज्जान संपूर्णपणे घेऊ शकत नाही. पण, तुम्हाला आता कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबर काम करायाला शिकावं लागेल,’ असं गार्टनरमधील मुख्य संशोधन अधिकारी फिलिप वॉल्श म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा माहिती तंत्रज्ज्ञानावर नेमका काय परिणाम होईल हे या अहवालात सविस्तर नमूद करण्यात आलं आहे. (IT Jobs Future)
(हेही वाचा – BJP मध्ये अंतर्गत नाराजी; पदाधिकाऱ्याची उपरोधिक ‘X’ post चर्चेचा विषय)
छोट्या मुदतीत – कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने अभियंत्यांना मदतच होईल. त्यांची काही कामं ही प्रणाली सोपं करेल. सॉफ्टवेअर तयार करताना काही अवघड कामं एआयच्या मदतीने होतील.
मध्यम मुदतीत – एआय कोडिंगमध्येही मदत करेल. अभियंत्यांचं बहुतेक काम हे संगणकाच्या म्हणजेच एआयच्या मदतीने होऊ शकेल. त्यांना एआय यंत्रणेकडून कोडिंगचं कामही करून घेता येईल.
दीर्घ मुदतीत – संस्थांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग क्षेत्रातील जाणकार लोकांची गरज भासेल. या एआय अभियंत्यांना एआयच्या मदतीने सॉफ्टवेअर विकसित करण्याचं तंत्र अवगत करून घ्यावं लागेल. डेटा कसा वापरायचा याचं ज्जानही एआयच्या मदतीने होईल.
त्यामुळे सॉफ्टवेअर अभियंत्याचं काम आणि कामाची पद्धत बदलणार असली तरी त्यांची गरज कमी होणार नाही, असं गार्टनरचा हा अहवाल सांगतो. (IT Jobs Future)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community