IT Pay Hike : एचसीएल टेक आणि इन्फोसिस दिवाळीनंतर देणार कर्मचाऱ्यांना पगार वाढ

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी मागच्या दोन वर्षात कर्मचारी कपातच केली आहे.

118
IT Pay Hike : एचसीएल टेक आणि इन्फोसिस दिवाळीनंतर देणार कर्मचाऱ्यांना पगार वाढ
IT Pay Hike : एचसीएल टेक आणि इन्फोसिस दिवाळीनंतर देणार कर्मचाऱ्यांना पगार वाढ
  • ऋजुता लुकतुके

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी मागच्या दोन वर्षात कर्मचारी कपातच केली आहे. पण, या दिवाळीत आता काही कंपन्या पगारवाढ करताना दिसत आहेत. एचसीएल टेक्नोलॉजीज लिमिटेड या कंपनीने ऑक्टोबरपासून कंपनीतील कनिष्ठ पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ देणार असल्याचं जाहीर केलं आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मात्र यंदा पगारवाढ मिळणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं आहे. कर्मचारी कपातीच्या बातम्यांनी आलेली मरगळ त्यामुळे थोडी कमी होणार आहे. (IT Pay Hike)

एचसीएल टेक कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचा आर्थिक ताळेबंद मांडताना कंपनीचे वित्तविषयक मुख्य अधिकारी रामचंद्रन सुंदरराजन यांनी ही माहिती दिली. ‘कर्मचाऱ्यांची पगार वाढ काही कारणांमुळे ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलावी लागली. पण, आता कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्यांना पगारवाढ लागू होणार आहे. मध्यम आणि वरच्या पदांवर काम करणाऱ्यांना यंदा पगारवाढ मिळणार नाही. पण, कंपनीतील ९० टक्के कर्मचारी वर्ग हा कनिष्ठ स्तरावर काम करणाराच आहे,’ असं सुंदरराजन यावेळी बोलताना म्हणाले. (IT Pay Hike)

कंपनीत नव्याने कर्मचारी भरतीही आता सुरू होणार आहे. पुढील वर्षी नवी दिल्लीतील विद्यालयांमधून १०,००० नवीन कर्मचारी भरती केले जातील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. गेल्यावर्षी कंपनीने २७,००० नवीन कर्मचाऱ्यांना कंपनीत सामावून घेतलं होतं. त्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी नोकर कपातीच्या वातावरणात कंपनी नवीन भरती करणार असल्याची बातमी सकारात्मकच मानली जातेय. (IT Pay Hike)

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : …त्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवत आहे; जरांगे पाटील यांचा आरोप)

फक्त एचसीएल टेकच नाही तर इन्फोसिस या देशातील दिग्गज आयटी कंपनीनेही दिवाळीनंतर पगारवाढीचे संकेत दिले आहेत. कंपन्यांमध्ये पगार वाढीचे निर्णय हे नवीन आर्थिक वर्षं सुरू होताना घेतले जातात. पण, यंदा नवीन वर्षाची सुरुवात युद्धजन्य परिस्थितीत झाल्यामुळे कंपन्यांनी पगारवाढीचे निर्णयही रोखून धरले होते. (IT Pay Hike)

आता दुसऱ्या तिमाहीत कंपन्या पगारवाढ करताना दिसत आहेत. इन्फोसिस कंपनीने कर्मचाऱ्यांना पगार वाढीविषयीचा ईमेलही लिहिला आहे आणि नवीन पगार १ नोव्हेंबरपासून लागू होईल असं यात म्हटलं आहे. इन्फोसिसने नवीन कर्मचारी भरती करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. (IT Pay Hike)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.