लवकरच मुंबईत संपूर्ण ‘अनलॉक’? महापौरांचे संकेत

मुंबईकरांच्या दृष्टीने ही आनंदीची बाब समजण्यात येत आहे.

136

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईत 100 टक्के अनलॉक करण्यात येऊ शकतो, असे संकेत मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने ही आनंदीची बाब समजण्यात येत आहे.

(हेही वाचाः गिरणी कामगारांसाठी खुशखबर मिळणार हक्काचे घर!)

काय म्हणाल्या महापौर?

येत्या आठवड्याभरात मुंबईत 100 टक्के लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईत 100 टक्के अनलॉक केला जाऊ शकतो, अशी शक्यता महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे. लवकरात लवकर सर्व काही सुरळीत होणं गरजेचं आहे, असं देखील महापौर यावेळी म्हणाल्या.

पण नियमांचे पालन करा

जरी निर्बंध शिथिल करण्यात आले तरी जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडून मास्क न वापरण्याचे आदेश येत नाहीत तोपर्यंत आपण मास्क वापरणं गरजेचं आहे, असं एक महापौर म्हणून माझं जनतेला सांगणं आहे, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये आणि सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करुन स्वतःला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः लॉकडाऊनकाळात गावकरीच ठरले वन्यप्राण्यांचे शिकारी !)

लहान मुलांच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद

100 टक्के लसीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असताना मुंबईत 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला संथ गतीने प्रतिसाद मिळत आहे, असे महापौर म्हणाल्या. पण लसीकरणाशिवाय पर्याय नाही हे आता नागरिकांना कळू लागल्याने हा प्रतिसाद नक्कीच वाढेल असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.