आयटीआरची तारीख झाली जाहीर; असे करा नियोजन

88

करदाते आता ई-फायलिंग पोर्टलवर आर्थिक वर्ष 2022-2023 साठी प्राप्तिकर रिटर्न दाखल करु शकतात. प्राप्तिकर विभागाने ट्वीट करुन करदात्यांना आयटीआर भरण्याची विनंती केली आहे. यावर्षी कर भरण्याच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभाग करदात्यांना मागील वर्षाच्या कर प्रणालीनुसार, कर भरायचा आहे का किंवा तुम्हाला त्यात बदल करायचा आहे का? अशी विचारणा करत आहे. नेमके काय ते जाणून घेऊ…

शेवटची तारीख काय?

सामान्य करदात्यांसाठी 2021-22 वर्षासाठी आयटीआर भरण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2022 आहे. दुसरीकडे, ऑडिट आवश्यक असलेल्या व्यवसायांसाठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. जर करदात्याने कोणताही परदेशी किंवा देशाअंतर्गत स्पेसिफाईड व्यवहार केला असेल, तर 30 नोव्हेबरपर्यंत रिटर्न भरता येईल.

कागदपत्रे कोणती हवी

ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर भरण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, फाॅर्म 16, बॅंक खात्याचे तपशील, गुंतवणुकीचे तपशील आणि पुरावे आणि इतर उत्पन्नाचे पुरावे आवश्यक आहेत. पॅन आणि आधार लिंक असणेही आवश्यक आहे. करदात्याचा ई-मेल आयडीदेखील प्राप्तिकर विभागाकडे नोंदणीकृत असावा.

कसा भरणार आयटीआर?

  • प्राप्तिकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ WWW.income tax.gov.in ला भेट द्या.
  • तुमचा युजर आयडी म्हणजेच पॅन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लाॅग इन करा.
  • ई-फाइल मेनूवर जा आणि प्राप्तिकर रिटर्न लिकवर क्लिक करा.
  • असे केल्यानंतर, तुम्ही आयटीआर पेजवर जाल. तेथे फाईल नाउ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता आर्थिक वर्ष 2022-2023 निवडा आणि फायलिंगच्या ऑनलाईन मोडवर क्लिक करा.
  • स्टेटसमध्ये इंडिविज्युयलवर क्लिक करुन तुमचा आयटीआर फाॅर्म निवडा. जर एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत असेल, तर आयटीआर फाॅर्म 1 वर क्लिक करा.
  • त्यानंतर लेट्स गेट स्टार्टवर क्लिक करा आणि नंतर रिटर्न भरण्याचे कारण निवडा.
  • आता तुमचे तपशील वॅलिडेट करा. त्यानंतर व्हेरिफाय आणि नंतर सबमिटवर क्लिक करा.
  • आता टॅक्सेस पेज अॅण्ड व्हेरिफिकेशन टॅबमध्ये योग्य व्हेरिफिकेशन पर्याय निवडा किंवा 120 दिवसांच्या आत त्याला सत्यापित करु शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.