ITR Filing 2024 : व्हॉट्सॲपवरून कसं भरायचं आर्थिक विवरणपत्र याचा संपूर्ण लेखाजोखा

ITR Filing 2024 : क्लिअर टॅक्सने दिलेली ही सुविधा १० भाषांमध्ये उपलब्ध आहे.

179
ITR Filing 2024 : व्हॉट्सॲपवरून कसं भरायचं आर्थिक विवरणपत्र याचा संपूर्ण लेखाजोखा
  • ऋजुता लुकतुके

आता तुम्ही आयकर विवरणपत्र व्हॉट्सॲपवरही भरू शकता. क्लिअरटॅक्स ॲपने ही सुविधा देऊ केली आहे. १० भाषांमध्ये आणि आयटीआर १ व आयटीआर ४ प्रकारची विवरणपत्र तुम्ही या अंतर्गत भरू शकता. ‘आम्ही विवरणपत्र भरण्याची प्रक्रियाही सोपी केलीय आणि त्याचबरोबर ती सर्वांपर्यंत पोहोचवलीय. तुमचं विवरणपत्र आता तुम्ही स्वत: खूप कमी त्रासात भरू शकता. लोक जिथे असतील, तिथे आम्ही त्यांच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचणार आहोत आणि लोकांना त्यांचा रिफंडही अगदी सोप्या पद्धतीने मिळणार आहे.’ असं क्लिअरटॅक्सचे संस्थापक अर्चित गुप्ता यांनी सांगितलं. (ITR Filing 2024)

आयटीआर १ किंवा सहज हा विवरणपत्राचा एक प्रकार आहे. तुम्ही पगारदार किंवा निवृत्तीवेतनधारक असाल किंवा एका निवासी घरातून तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर तुम्हाला हे विवरणपत्र भरायचं असतं. गेमिंग, सट्टेबाजी किंवा लॉटरीतून आलेलं उत्पन्न वगळता इतर सर्व उत्पन्नांसाठी हे विवरणपत्र चालतं. (ITR Filing 2024)

तर आयटीआर ४ हे विवरणपत्र व्यावसायिकांना लागू होतं. भागिदारीत व्यवसाय करणारे किंवा व्यावसायातून ज्यांना उत्पन्न मिळतं, त्यांच्यासाठी हे विवरणपत्र आहे. याला सुगम असंही म्हटलं जातं. (ITR Filing 2024)

(हेही वाचा – Parliament News : संसद आणि लाल किल्ला बॉम्बने उडवण्याची धमकी!)

वॉट्सॲपवर सहज, सुगम कसे भरायचे?

क्लिअरटॅक्सच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवा.

तुमच्यासाठी योग्य विवरणपत्र निवडा. सध्या या सेवेत सहज (आयटीआर १) व सुगम (आयटीआर ४) ही विवरणपत्र उपलब्ध आहेत

तुमचं कृषि उत्पन्न ५००० रुपयांपेक्षा कमी असेल तरी हे फॉर्म तुम्ही भरू शकता. किंवा तुम्ही व तुमचा जोडीदार याचं एकत्रित उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता.

तुमची वैयक्तिक माहिती, मिळकतीचे पुरावे, गुंतवणुकीचे पुरावे या गोष्टी तुम्ही फोटो, ऑडिओ आणि लेखी स्वरुपात देऊ शकता.

आयकर देय असेल तर याच वॉट्सॲप इंटरफेसवर तुम्ही पैसही भरू शकता.

आणि त्यानंतर फॉर्म तुम्ही वर्ग केला की, तुम्हाला आयटीआर ५ (पावती) मिळते.

मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, बंगाली अशा १० भाषांमध्ये सध्या ही सेवा उपलब्ध आहे. आणि आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै २०२४ आहे. (ITR Filing 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.