ऋजुता लुकतुके
आयकर विभागाने शुक्रवारी एक महत्त्वाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. (ITR Filing) यात गेल्या ८ वर्षांत आर्थिक विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या ९० टक्क्यांनी वाढल्याचं म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ही संख्या ६३.७ दशलक्ष होती, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. (ITR Filing)
(हेही वाचा – Mukesh Ambani Death Threats : रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी )
वैयक्तिक करदात्यांचं प्रमाणही २०१३-१४ मध्ये ३.३६ कोटी इतकं होतं, ते २०२१-२२ मध्ये ६.३७ कोटींवर गेलं आहे. ही वाढ ९० टक्के इतकी आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातही ७.४१ कोटी लोकांनी आपलं आर्थिक विवरणपत्र भरलं आहे. आणि यात ५३ लाख लोक पहिल्यांदा विवरणपत्र भरणारे आहेत. (ITR Filing)
Income Tax Returns file by individual taxpayers register increase of 90% from 3.36 crore in Assessment Year 2013-14 to 6.37 crores in 2021-22. @FinMinIndia says, average gross total income for individual taxpayers register increase of 56 % from 2013-14 to 2021-22.
Over 7.41… pic.twitter.com/21UfXFZiDP
— All India Radio News (@airnewsalerts) October 27, 2023
या आकडेवारीतून करदात्यांच्या वार्षिक उत्पन्नाचीही कल्पना येते. आणि ते पाहता ५ ते १० रुपये इतकं उत्पन्न असलेल्या वैयक्तिक करदात्यांची संख्या मागच्या ८ वर्षांत २९५ टक्क्यांनी वाढली आहे. तर १० ते २५ लाख रुपये इतकं वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांचं प्रमाणही तब्बल २९१ टक्क्यांनी वाढलं आहे. (ITR Filing)
पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्याही मागच्या आठ वर्षांत ३२ टक्क्यांनी वाढली आहे. २०१३-१४ मध्ये ही संख्या २.६२ कोटी इतकी होती. ती वाढून २०२१-२२ मध्ये ३.४७ इतकी झाली आहे.
‘देशात तरुण लोकसंख्या कमी उत्पन्न गटातून मोठ्या उत्पन्न गटात स्थलांतरित होत असल्याचं आश्वासक चित्र या आकडेवारीतून दिसत आहे,’ असं प्रत्यक्ष कर विभागाने ही आकडेवारी प्रसिद्ध करताना म्हटलं आहे. २०२१-२२ च्या आकडेवारीनुसार, देशातील करदात्यांचं सरासरी उत्पन्न आता ७ लाख रुपये वार्षिक इतकं झालं आहे. २०१३-१४ मध्ये ते ४.५ लाख इतकं होतं. (ITR Filing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community