ITR Filing : आयटीआर फायलिंग विषयी महत्त्वाच्या तारखा

ITR Filing : आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख या महिन्यात येतेय.

1480
ITR Filing 2024 : व्हॉट्सॲपवरून कसं भरायचं आर्थिक विवरणपत्र याचा संपूर्ण लेखाजोखा
  • ऋजुता लुकतुके

करदात्यांसाठी जुलै महिना सगळ्यात महत्त्वाचा. आधीच्या आर्थिक वर्षांत केलेल्या सगळ्या गुंतवणूक आणि कमाई यांचा हिशोब मांडून सरकारला आयकर भरण्याचा आणि त्याचं विवरणपत्र सादर करण्याचा हा महिना आहे. ३१ जुलै ही विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख आहे हे अनेकांना माहीत असेल. गेल्यावर्षीपासून अर्थ मंत्रालयाने मुदतवाढ देणंही बंद केलं आहे. (ITR Filing)

आता जाणून घेऊया जुलै महिन्यात विवरणपत्रा भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. इतर महत्त्वाच्या तारखा कुठल्या आहेत? (ITR Filing)

आर्थिक विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख कोणती?

आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी आर्थिर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै ही आहे.

ही तारीख चुकली तर काय होईल?

डिसेंबर २०२४ पर्यंत तुम्हाला विलंबित विवरणपत्र भरता येईल.

विलंबित विवरणपत्र भरण्याचं विलंब शुल्क किती आहे?

विलंब शुल्क रुपये १,००० ते रुपये १०,००० इतकं आहे. जितका उशीर होईल तेवडं हे शुल्क वाढतं.

(हेही वाचा – भर सभागृहात शिवीगाळ करणं भोवलं, अखेर Ambadas Danve यांच्यावर मोठी कारवाई)

आर्थिक विवरणपत्र कुणी भरायचं?

तुमचं एका आर्थिक वर्षातील उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला विवरपणपत्र भरणं अनिवार्य आहे. शिवाय तुम्ही भारताचे नागरिक असाल. पण, परदेशात तुमची काही मालमत्ता असेल. किंवा परदेशातील मालमत्तेतून तुम्हाला काही मिळकत मिळत असेल तर तुम्हाला विवरणपत्र भरावंच लागतं. भारताबाहेर एखादं आर्थिक खातं तुम्ही सांभाळत असाल तरी तुम्हाला विवरणपत्र दाखल करावं लागतं. परदेशातली एखादा म्युच्युअल फंड, शेअर, बाँड यांच्यात तुमची गुंतवणूक असेल आणि तुम्ही पगारदार किंवा कमावणाऱ्या नसाल तरीही तुम्हाला विवरणपत्र भरावंच लागतं. तुम्ही एका वर्षात एक लाख रुपयांपर्यंतचं वीज बिल भरलं असेल किंवा परदेश वारीवर दोन लाख रुपये खर्च केले असतील तर तुम्हाला विवरणपत्र भरावंच लागतं. तुमच्या सर्व खात्यात मिळून ५०,००,००० लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला विवरणपत्र भरावं लागतं. (ITR Filing)

कुठलं विवरणपत्र भरायचं?

इनकम टॅक्स रिटर्न अर्थात आर्थिक विवरणपत्राचे चार प्रकार आहेत. आयटीआर १ ते आयटीआर ४ असे चार वेगळे फॉर्म असतात.

आयटीआर १ – पगारदार, एका घरातून उत्पन्न असलेले व इतर स्त्रोत

आयटीआर २ – वैयक्तिक करदाते व एचयुएफ, ज्यांचं व्यावसायिक उत्पन्न नाही

आयटीआर ३ – वैयक्तिक करदाते व एचयुएफ ज्यांना उद्योगधंद्यातून प्राप्ती होते

आयटीआर ४ – अनिश्चित मिळकत असलेले व्यावसायिक व उद्योजक

विवरणपत्रासोबत लागणारे दस्तऐवज कुठले?

विवरणपत्राबरोबर कुठलंही कागदपत्र जोडावं लागत नाही. पण, पगारदार असाल तर तुमचा फॉर्म १६, पॅन व आधार कार्ड, टीडीएस कापला गेला असेल तर त्याच्या नोंदी, बँक खात्यातील नोंदी व नवीन शेअर खरेदी किंवा इतर कुठलाही व्यवहार असेल तर तशी नोंद असलेलं कागदपत्र या गोष्टी लागतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.