ITR Filing : ‘या’ वेबसाईटवर भरता येतं ऑनलाईन विवरणपत्र

ITR Filing : काही वेबसाईट ऑनलाईन विवरणपत्र भरण्याबरोबरच तयारीतही मदत करतात.

123
ITR Filing 2024 : व्हॉट्सॲपवरून कसं भरायचं आर्थिक विवरणपत्र याचा संपूर्ण लेखाजोखा
  • ऋजुता लुकतुके

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आर्थिक विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै आहे आणि यंदाही गेल्या खेपेप्रमाणे मुदतवाढ मिळणार नाहीए. तुमच्यापैकी बरेच जण विवरणपत्र भरण्यासाठी सीए किंवा इतर वाणिज्य शाखेशी निगडित लोकांची मदत घेत असतील. पण, खरंतर विवरणपत्र स्वत:चे स्वत: ऑनलाईन भरणं खूपच सोपं आहे. अलीकडे काही वेबसाईटच्या मदतीने ते आणखी सोपं झालं आहे. तुमचा कंपनीने दिलेला फॉर्म १६ तुमच्या बरोबर असेल आणि पॅन कार्ड समोर असेल तर तुम्ही घरी बसूनही विवपणपत्र फाईल करू शकता. (ITR Filing)

आयकर विभागाच्या वेबसाईटच्या बरोबरीने इतरही काही खाजगी वेबसाईट यासाठी तुम्हाला मदत करतात. कुठल्या कुठल्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन विवरणपत्र भरता येतं याची माहिती घेऊया, (ITR Filing)

विवरणपत्र भरण्याबरोबरच तुमचं करदायित्व नेमकं किती याची आधी माहिती घेणं महत्त्वाचं असतं. ती माहिती घेतल्यावर देय असलेला आयकर लगेच ऑनलाईन भरता येणंही महत्त्वाचं. या कामी काही वेबसाईट आपली मदत करतात. (ITR Filing)

आयकर विभागाचं अधिकृत पोर्टल (www.incometaxindiaefiling.gov)

आयकर विभागाचं हे अधिकृत ई पोर्टल आहे आणि भारत सरकारने ते बनवलं आहे. यात करदात्यांनी कोणत्या विवरणपत्राची निवड करायची पासून ते कर दायित्व किती आहे ते सांगण्यासाठी सर्व प्रकारचे प्रोग्राम आहेत. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पॅन कार्डवरून तुमची माहिती इथं आधीच भरून येते. ती तपासून किंवा त्यात आवश्यक ते बदल करून तुम्ही विवरणपत्र सादर करू शकता.

देय आयकर ऑनलाईन भरण्याची सोयही यात आहे. तसंच विवरणपत्र ई-व्हेरिफाय करण्याचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुटसुटीत आणि सोपी अशी ही वेबसाईट ऑनलाईन ई-फायलिंगसाठी लोकांचा लोकप्रिय पर्याय आहे. (ITR Filing)

टॅक्स टी विन (www.tax2win.in)

या वेबसाईटवर विवरणपत्र भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही स्वत:हून विवरणपत्र भरू शकता. किंवा ते भरण्यासाठी ऑनलाईन तज्ज्ञाची मदत घेऊ शकता. इथं तुम्हाला कागदपत्र अपलोड करता येतात. किंवा तुमचा रिफंडही इथं तुम्हाला ट्रॅक करता येतो. शिवाय काही अडचण किंवा शंका असल्यास इथली हेल्पलाईन २४ तास खुली असते. त्यामुळे हळू हळू लोकांचा या वेबसाईटकडे कल वाढत आहे. (ITR Filing)

(हेही वाचा – राज्यातील शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट; मंत्री Shambhuraj Desai यांनी सुनावले खडे बोल…..!)

माय आयटी रिटर्न (www.myitreturn.com)

इथं विवरणपत्र भरण्यासाठी विविध पायऱ्यांवर लागणारी मदत वेबसाईटने देऊ केली आहे. प्रत्येक पायरीवर विवरणपत्र भरणाऱ्याने काय तयारी केली पाहिजे, हे इथं सांगितलं जातं. शिवाय या वेबसाईटवर तुम्हाला ई-व्हेरिफिकेशनचीही सोय आहे. तसंच रिफंड कधी मिळणार याचा आढावाही तुम्ही घेऊ शकता. (ITR Filing)

टॅक्स स्पॅनर (www.taxspanner.com)

टॅक्स स्पॅनर वेबसाईट पगारदार व्यक्ती, उद्योजक तसंच व्यावसायिक यांच्या वेगवेगळ्या गरजा ओळखून त्यांना विवरणपत्र भरण्यासाठी मदत करते. परदेशस्थ नागरिकांसाठीही इथं वेगळी मदत देऊ केली जाते. या वेबसाईटवर कराविषयक जटील विषयांसाठी जाणकारांची मदत मिळते. तसंच गरज असल्यास ऑडिटही करून दिलं जातं. (ITR Filing)

ईझी टॅक्स (www.eztax.in)

ईझी टॅक्स वेबसाईटचा इंटरफेस सगळ्यात सोपा मानला जातो. पगारदार, व्यावसायिक आणि उद्योजकांना इथं विविध सेवा गरजेनुसार दिल्या जातात. कर दायित्वाचा अचूक अंदाज आणि सुटसुटीत ई-व्हेरिफिकेश ही ईझी टॅक्सची वैशिष्ट्यं आहेत. शिवाय इथं चॅटिंग आणि ई-मेलच्या माध्यमातून समुपदेशन सेवाही दिली जाते. (ITR Filing)

टॅक्स बडी (www.taxbuddy.com)

टॅक्स बडी ही फक्त विवरणपत्र भरण्यासाठीच नाही तर कर बचत आणि त्यासाठीच्या गुंतवणुकीकतही मदत करणारी करणारी वेबसाईट आहे. त्यामुळे फक्त विवरणपत्र भरतानाच नाही तर वर्षभर ती तुम्हाला आर्थिक नियोजनासाठी मदत करते. करविषयक तज्ज्ञाची मदतही या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला मिळवता येते. (ITR Filing)

क्लिअर टॅक्स (www.cleartax.in)

क्लिअर टॅक्स ही अल्पावधीच लोकप्रिय झालेली वेबसाईट आहे. इथंही तुम्हाला करविषयक नियोजन करता येतं. तसंच तुमचं कर दायित्व कमी करण्यासाठी गुंतवणुकीचे सल्लेही इथं तुम्हाला दिले जातात. पगारदार व्यक्ती, फ्रीलान्सर तसंच व्यावसायिकांना इथं आर्थिक बाबतीत मदत मिळू शकते. (ITR Filing)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.