ITR Filing : ‘या’ २८ बँकांमध्ये भरू शकता आयकर, जाणून घ्या बँकांची यादी

ITR Filing : २८ बँकांमध्ये तुमची खाती असतील तर आयकर भरणं आता आणखी सोपं झालंय. 

128
ITR Filing 2024 : व्हॉट्सॲपवरून कसं भरायचं आर्थिक विवरणपत्र याचा संपूर्ण लेखाजोखा
  • ऋजुता लुकतुके

आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. तोपर्यंत आपली आर्थिक वर्ष २०२३-२४ ची मिळकत काय आहे. कर वजावट मिळवणारी कुठली गुंतवणूक आपण केलेली आहे याचा आढावा घेण्याची वेळ आता आली आहे. त्यानंतर तुम्हाला नेमका किती आयकर भरायचा आहे याची तुम्हाला कल्पना येईल. ती रक्कम ठरली की, तुम्हाला ऑनलाईन आयकर भरण्याबरोबरच आणखी एक पर्याय आहे तो नजिकच्या बँकेत जाऊन आयकर भरण्याचा. हा पर्यायही सोपा आणि सुटसुटीत आहे. अशा थोड्याखोडक्या नाही तर २८ बँका आहेत जिथे तुम्ही आयकर भरू शकता. (ITR Filing)

काहीवेळा विवरणपत्र भरल्यानंतर कंपनीने कापलेल्या टीडीएसपेक्षा तुमचा देय आयकर जास्त असल्याचं लक्षात येतं. त्यावेळी तुम्ही या बँकांचा पर्याय निवडू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुमचं ऑनलाईन बँकिंग असेल तर तुम्ही इथंही कर ऑनलाईन भरू शकता. (ITR Filing)

(हेही वाचा – Wimbledon 2024 : युक्रेनची एलिना स्वितोलिनाची उपउपांत्य फेरीत धडक)

ॲक्सिस बँक, बंधन बँक, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्रा बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक इथं तुम्ही आयकर भरू शकता. या २८ बँकांच्या यादीतील इतर बँका आहेत त्या म्हणजे इंडियन ओव्हसीज बँक, इंडसइंड बँक, जम्मू व काश्मीर बँक, करुर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, कर्नाटका बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब सिंध बँक, आरबीएल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, साऊथ इंडियन बँक, युको बँक, युनियन बँक व धनलक्ष्मी बँक. (ITR Filing)

तुम्ही भरलेला कर हा तुम्ही देय असलेल्या करापेक्षा जास्त असेल तर आयकर विभाग तुम्हाला रिफंड लागू करतं. ते अतिरिक्त पैसेही तुमच्या या बँक खात्यात जमा होऊ शकतील. विवरणपत्र भरताना तुम्ही नवीन कर प्रणाली किंवा जुनी कर प्रणाली यातील कोणती निवडताय याचा नीट आढावा घ्या. (ITR Filing)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.