मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात दाखल झालेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शु्क्रवार, 12 जानेवारी रोजी फेटाळून लावली. (HC on Maratha Aandolan)
(हेही वाचा – Rhythm Sangwan : नेमबाज रिदम सांगवान ऑलिम्पिकसाठी पात्र)
याचिका दाखल करून घेण्यास नकार
मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजातील नेत्यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. हेमंत पाटील या व्यक्तीने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आझाद मैदानावरील (Azad Maidan) आंदोलनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
एकाच दिवशी दोन्ही समाजघटक एकाच ठिकाणी आंदोलन करणार आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेची भीती निर्माण होण्याची भीती असल्याने जरांगे यांच्या मुंबईतील (Mumbai) आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी पाटील यांनी आपल्या याचिकेद्वारे केली होती. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला.
(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद मोदी मुंबई दौऱ्यावर, अटल सेतूचे उद्घाटन पहा LIVE )
काय म्हणाले न्यायालय ?
आम्ही त्यांना कसे रोखणार, हे आमचे काम नाही. न्यायालय येथे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बसले नाही. आम्हाला याहून महत्त्वाची कामे आहेत, असे प्रश्न या वेळी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Devendra Kumar Upadhyay) यांच्या नेतृत्वातील खंडपिठाने याचिका फेटाळतांना याचिकाकर्त्याला सुनावले.
‘मराठा समाज मुंबईत आल्यानंतर आरक्षण घेऊनच राज्याची राजधानी सोडेल अन्यथा नाही’, असा इशारा मनोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला दिला आहे. (HC on Maratha Aandolan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community