मृत्यूच्या भयाने पेंटिंग काढून जगतोय ‘हा’ अब्जाधीश

93

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या सरकारवर टीका केल्यानंतर आघाडीची ई- काॅमर्स कंपनी आघाडीची ई-काॅमर्स कंपनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, ते सध्या जपानची राजधानी टोकियो येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. अतिशय साधेपणाने ते राहत असून चीनमधून ते तिथे त्यांचा शेफ आणि सुरक्षारक्षकही घेऊन गेले आहेत.

जॅक मा यांनी जिनपिंग यांच्यावर टीका करताना, चीनच्या सरकारी धोरणांवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर चीन सरकार त्यांची हत्या करु शकते, अशी चर्चा होती. एंट ग्रूप या मा यांच्या एका कंपनीचा आयपीओदेखील चीनने रोखला होता. तेव्हापासून मा बेपत्ता झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कुटुंबीयांसोबत सहा महिन्यांपासून जपानमध्ये आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल येथेही ते अनेकदा गेले आहेत.

( हेही वाचा: ‘अजूनही वेळ आहे, समजून घ्या गुजरातींनो’; बाळासाहेबांचा Video शेअर करत जडेजाचं ट्वीट )

जॅक मा यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये अखेरचे ट्वीट केले होते. 2021 मध्ये त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. मा हे 2015 मध्ये भारतातही आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भारतात व्यवसाय सुरु करण्याबाबत त्यांनी रुची दर्शवली होती.

जपानमध्ये काय करतात जॅक मा?

जॅक मा हे जपानमध्ये वेळ घालवण्यासाठी वाॅटर कलर पेंटिंग करतात. चीनमधून बाहेर पडल्यानंतर ते स्पेन व नेदरलॅंड या देशांमध्येही दिसले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.