‘वक्फ’ सुधारणांवरून मुस्लिमांची दिशाभूल; जेपीसीचे अध्यक्ष Jagdambika Pal यांची टीका

69
'वक्फ' सुधारणांवरून मुस्लिमांची दिशाभूल; जेपीसीचे अध्यक्ष Jagdambika Pal यांची टीका
'वक्फ' सुधारणांवरून मुस्लिमांची दिशाभूल; जेपीसीचे अध्यक्ष Jagdambika Pal यांची टीका

वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्धच्या (Waqf Amendment Bill) देशव्यापी आंदोलनाबद्दल भाजपा खासदार आणि ‘जेपीसी’चे अध्यक्ष जगदांबिका पाल (Jagdambika Pal ) यांनी ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’वर (All India Muslim Personal Law Board) टीका केली आहे. तसेच या मुद्दयांचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी बोर्डावर केला आहे.

( हेही वाचा : Bahadurpur मधील शिवमंदिरात कीर्तन करणाऱ्या महिलांवर धर्मांधांचा हल्ला; ३० जणांविरुद्ध एफआयआर दाखल

वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) हे घटनाविरोधी असल्याचा दावा ‘एआयएमपीएलबी’ने केला आहे. दि. २६ मार्च रोजी बिहारची राजधानी पटना येथे आंदोलन केले. त्यावर वक्फ विधेयकाच्या ‘जेपीसी’चे अध्यक्ष जगदंबिका पाल (Jagdambika Pal ) यांनी टीका केली. ते म्हणाले की, ” ज्या पद्धतीने ‘एआयएमपीएलबी’ ‘वक्फ’च्या नावाखाली राजकारण करत आहे. ते देशातील अल्पसंख्याक आणि मुस्लिमांची (Muslims) दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

पाल यांनी संयुक्त संसदीय समितीच्या (Joint parliamentary committee) अहवालाचा संदर्भ देत विधेयकाभोवतीच्या वादावर टीका केली. ते म्हणाले, “विधेयक अद्याप मंजूर झालेले नाही. तरीदेखील ‘एआयएमपीएलबी’ (All India Muslim Personal Law Board) आधीच राजकीय हेतूंवर आधारित निदर्शने आयोजित करत आहे. याद्वारे देशातील मुस्लिमांची दिशाभूल केली जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.