
देशात आपले वर्चस्व सुरक्षित ठेवण्यासाठी आर्थिक प्रलोभन दाखवून सुनियोजित पद्धतीने धर्मांतर केले जात असल्याचे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ (Jagdeep Dhankhar) यांनी दि. २ मार्च रोजी व्यक्त केले. केरळच्या (Kerala) तिरुवअनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) भारतीय विचार केंद्राने (Bhartiya vichar kendra) आयोजित केलेल्या चौथ्या परमेश्वरम स्मृती व्याख्यानात धनखड बोलत होते. त्यावेळी त्यांनी धर्मांतराचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावे, असे आवाहनही श्रोत्यांना केले.
( हेही वाचा : आयपीएलवर बहिष्कार टाका, पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू Inzamam-ul-Haq ने गरळ ओकली)
जनसांख्यिकी उत्क्रांती ही सहज आणि नैसर्गिकपणे घडणारी प्रक्रिया असावी, पण अनैसर्गिक बदल घडत असतील तर ते उधळून लावले पाहिजेत, असे मत धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “जनसांख्यिकी महत्त्वाची असते. त्याचा बहुसंख्याकवादाशी गोंधळ घालता कामा नये. आपला समाज दोन गटांमध्ये विभागला जाता कामा नये. जनसांख्यिकी उत्क्रांती सहज आणि नैसर्गिकपणे घडली तरच विविधतेत एकता दिसू शकेल.”
प्रलोभने, लालच दाखवून गरजू आणि असुरक्षित लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांना आधार देणे अशा विविध पद्धतींनी धर्मांतर (Conversion) घडवले जाते, असा आरोप उपराष्ट्रपतींनी केला. लोकांच्या वेदना, अडचणी किंवा गरजा पाहून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणे हे असह्य आहे असेही धनखड़ (Jagdeep Dhankhar) म्हणाले. त्याचवेळी, आपल्याला हव्या त्या धर्माचे पालन करणे हा मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community