जगभरातील मंदिर प्रशासन, भाविक आणि व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी १७ ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तिरुपती बालाजी येथे जागतिक मंदिर संमेलनाचे (Jagtik Mandir Sammelan) आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील सुरक्षा, गर्दी नियंत्रण, अन्नदान, पूजाविधी आणि आधुनिक व्यवस्थापन प्रणाली यावर या संमेलनात सखोल चर्चा होणार आहे. ही माहिती आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
“मंदिरांचा महाकुंभ” या संकल्पनेवर आधारित हे संमेलन मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. टेम्पल कनेक्ट आणि अंत्योदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील ८८ देशांतील १६८२ धार्मिक संस्था सहभागी होणार आहेत.
(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd ODI : रोहित शर्माने या बाबतीत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे)
संमेलनात ११२ हून अधिक मान्यवर वक्ते, १५ कार्यशाळा, ६० पेक्षा जास्त प्रदर्शन स्टॉल्स, तसेच मंदिर व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि नवनवीन संकल्पनांची मांडणी केली जाणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्मीय संस्थांना एकत्र आणत, मंदिर व्यवस्थापनात सुधारणा आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यावर भर दिला जाणार आहे. (Jagtik Mandir Sammelan)
टेम्पल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) यांनी सांगितले की, “जगभरातील मंदिर व्यवस्थापनातील उत्तम पद्धती समजून घेण्यासाठी आणि सनातन धर्माच्या मंदिर व्यवस्थापन क्षेत्रात नवकल्पना रुजवण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल.”
(हेही वाचा – मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावीत; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश )
अंत्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष नीता लाड यांनी सांगितले की, “या जागतिक मंचावर मंदिर व्यवस्थापनाच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना सुचवल्या जातील. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल.”
या संमेलनात जगभरातील मंदिर व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ, धार्मिक संस्था, पुजारी आणि शास्त्रसंपन्न व्यक्ती एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. त्यामुळे हे संमेलन मंदिर व्यवस्थापनाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. (Jagtik Mandir Sammelan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community