Haryana मध्ये कोसळले लढाऊ विमान; प्रशिक्षण उड्डाण करतांना घडला अपघात

64
Haryana मध्ये कोसळले लढाऊ विमान; प्रशिक्षण उड्डाण करतांना घडला अपघात

हरियाणातील (Haryana) पंचकुला येथे भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) जग्वार (Jaguar) हे लढाऊ विमान कोसळले. या अपघातात पायलट थोडक्यात बचावला आहे. हवाई दलाने निवेदन प्रसारित करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

(हेही वाचा – ‘स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा टोला)

लढाऊ विमानाने अंबाला एअरबेसवरून (Ambala Airbase) प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. पंचकुलाच्या (Panchkula) डोंगराळ भागात असलेल्या मोरनी येथील बालदवाला गावाजवळ हे विमान कोसळले. लढाऊ विमानाचा पायलट पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे उतरवण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे.

पायलटने विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यापूर्वी हे विमान जमिनीवर कुठल्याही वसाहतीपासून दूर अथवा निर्जनस्थळी नेल्याने जीवितहानी टळली आहे. सिस्टिममधील बिघाडामुळे संबंधित लढाऊ विमान कोसळले. असे भारतीय हवाई दलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Haryana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.