- ऋजुता लुकतुके
एप्रिल २०२१ मध्येच या गाडीचं बुकिंग सुरू झालं होतं. आता ती रस्त्यांवर दिसू लागेल.
जॅग्वार एफ-टाईप या कारचा आता नवा करकरीत आर-डायनॅमिक ब्लॅक व्हेरियंट बाजारात येणार आहे. आणि त्याचं बुकिंगही सुरू झालं आहे. मूळातच स्पोर्ट्स कार असलेल्या एफ-टाईपला आता आणखी स्पोर्टी लुक मिळणार आहे. त्यासाठी आर-डायनामिकमध्ये सीटची उंची कमी करण्यात आली आहे. नावाप्रमाणेच या व्हेरियंटच्या मॉडेलमध्ये एक्सटिरिअरमध्ये डायनॅमिक काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. तीन रंगांमध्ये ही कार उपलब्ध असेल.
ग्रिल सराऊंड्स, खिडकीची फ्रेम, पुढे असलेला स्प्लिटर, शेजारी असलेले व्हेंट्स आणि बॅजिंग हे सगळं काळ्या रंगात असेल. आणि गाडी लाल, काळ्या आणि करड्या रंगात उपलब्ध असेल.
(हेही वाचा – Aadhar Card Update : आधारसाठी अतिरिक्त शुल्क आकरल्यास लागणार ५० हजाराचा दंड)
गाडीच्या इंटिरिअरमध्येही महत्त्वाचे बदल झाले आहेत. चालकासमोरचा डिजिटाईझ्ड कंसोल १२.३ इंचांचा आहे. तर गाडीत १० इंचांचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट डिस्प्लेही आहे.
75 years in the making.
F-TYPE. https://t.co/jn2rYH7JLo pic.twitter.com/j0NsgLXRJ0— Jaguar India (@JaguarIndia) October 4, 2023
गाडीचं इंजिन ५ लीटर व्ही८ पेट्रोलचं आहे. आणि त्यातून ४५० अश्वशक्ती इतकी शक्ती निर्माण होते. तर टॉर्क ५८० एमएम इतकी आहे. गाडीत ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. कूप प्रकारासाठी या गाडीची किंमत १.३ कोटी रुपये इतकी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community