देशात एकीकडे मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी, पूर यासारख्या दुर्घटना घडत आहे तर दुसरीकडे (Jaipur Earthquake) जयपूर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेले आहे. राजस्थानातील जयपूर येथे केवळ अर्ध्या तासात तीनवेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज म्हणजेच शुक्रवार २१ जुलै रोजी पहाटे अर्ध्या तासात भूकंपाचे (Jaipur Earthquake) तीन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की लोक घाबरून घराबाहेर पडले. या घटनेमुळे सध्या जयपूरसह आजूबाजूच्या भागांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
(हेही वाचा – Irshalgad Landslide : आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू तर १०३ लोकांना वाचवण्यात यश)
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी जयपूर शहरात अर्ध्या तासाच्या कालावधीत तीन वेळा भूकंपाचे (Jaipur Earthquake) धक्के जाणवले आणि त्याची तीव्रता तीन वेळा स्वतंत्रपणे मोजली गेली. जयपूरमध्ये पहाटे ४.२५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता अनुक्रमे ३.१, ३.४ आणि ४.४ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. या भूकंपाची खोली १० किलोमीटर इतकी होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Rajasthan | An earthquake of Magnitude 4.4 strikes Jaipur
(CCTV Visuals)
(Video source – locals) pic.twitter.com/MOudTvT8yF— ANI (@ANI) July 20, 2023
पहिला भूकंप (Jaipur Earthquake) पहाटे ४.०९ मिनिटांनी झाला. त्याची तीव्रता ३.४ इतकी मोजली गेली. त्याचवेळी ४ वाजून २२ मिनिटांनी सर्वात जोरात भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर लगेच, ४ वाजून २५ मिनिटांनी तिसरा भूकंपाचा धक्का बसला. या तिन्ही भूकंपांच्या धक्क्यांमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community