Jaipur Express Firing : ‘त्या’ घटनेनंतर आता ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना स्वयंचलित गन देण्यास मनाई

141
Jaipur Express Firing : 'त्या' घटनेनंतर आता ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना स्वयंचलित गन देण्यास मनाई

जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Jaipur Express Firing) सोमवार ३१ जुलै रोजी पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे आरपीएफ कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केला असून त्याला सध्या ताब्यात घेतलं आहे. मृतांमध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे. मानसिक तणावामुळे चेतन याने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेच्या (Jaipur Express Firing) पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता स्वयंचलित हत्यारे दिली जाणार नाहीत. मात्र सर्क्युलर रेल्वे बोर्डाकडून अंतिम निर्णय येणं बाकी आहे. चेतन सिंहने AR-M1 रायफलने चौघांची हत्या केली होती.

(हेही वाचा – Dada Bhuse : वाहन चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करणार – दादा भुसे)

कर्मचाऱ्यांना हलकी हत्यारे मिळणार 

मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारच्या (Jaipur Express Firing) घटनेनंतर आता सेंट्रल आणि वेस्ट रेल्वेने ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना AK47 किंवा AR गन यांसारखे स्वयंचलित हत्यारे देण्याऐवजी हलकी हत्यारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेकडून हा निर्णय सध्या विभागीय सुरक्षा आयुक्तांकडून सोपवण्यात आला आहे. परंतु यावर अखेरचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार असून त्यानंतर सर्क्युलर जारी केले जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.