जल जीवन मिशन : ११ कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडणी

140

जलसंवर्धन आणि नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आपला देश जल जीवन मिशनसारख्या अनेक उपाययोजना करत आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली.

पंतप्रधान मोदींनी केले कौतुक 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन अंतर्गत 11 कोटी नळजोडण्यांचे उद्दिष्ट गाठल्याबद्दल प्रशंसा केली आहे.पंतप्रधान मोदींनी या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष स्थानावर काम करणाऱ्यांचे कौतुक केले आहे.

( हेही वाचा : शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांची हकालपट्टी; गजानन किर्तीकरांची नियुक्ती )

जलसंधारणासाठी देशातील उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार जलसंधारणासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जल जीवन मिशन, अटल भूजल योजना (अटल जल), प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय ), नमामि गंगे, राष्ट्रीय जलाशय मॅपिंग आणि व्यवस्थापन कार्यक्रम (NAQUIM) यांसारख्या विविध योजना आणि कार्यक्रम राबवत आहे.

जलसंधारणाचे महत्त्व ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सरपंचांना पत्राद्वारे जलसंधारण आणि साठवणीचे महत्त्व सांगितले. जलसंधारण ही लोकचळवळ बनवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच २७ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की “भारतात आदिवासी आणि ग्रामीण भागात ‘शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे ‘हा मंत्र घेऊन जाण्याची गरज आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी जलजीवन मिशनसाठी अर्थसंकल्पात हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.