Jalgaon News: जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी

180
Jalgaon News: जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी
Jalgaon News: जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी

दहीहंडीचा सण देशभरात उत्साहात साजरा झाला. मात्र काही ठिकाणी याला गालबोट लागल्याचे दिसून आले. जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील दहीहंडी फोडताना पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे घडली. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेस पाचोरा शहरात स्टेशन रोड वरील रिक्षा स्टॉपवर देखील काही रिक्षा चालकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते.

(हेही वाचा –Pantry Car मधील खाद्यपदार्थांसाठी रेल्वेचे विशेष अभियान)

दहीहंडी फोडण्यासाठी नितीन चौधरी (Nitin Chaudhary) हा रिक्षा चालक गोविंदाने पुढाकार घेतला. मात्र दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना तो डोक्यावर कोसळल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Jalgaon News)

(हेही वाचा –छ. शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करणार – DCM Devendra Fadnavis)

नितीन चौधरी हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्ता गेल्याने या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील उभा राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी केली जात आहे. (Jalgaon News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.