जळगावात ३० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस पलटली 

114

जळगावातील शेदुर्णी येथे शुक्रवार, ३१ मार्च रोजी सकाळी सरस्वती विद्या मंदिर या शाळेची बस पलटली. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये सुमारे 30 विद्यार्थी आणि शिक्षक होते. पैकी दोन शिक्षक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात जखमी झालेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. या अपघातातील जखमींपैकी कुणाची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू होते. तर, अपघातामध्ये जखमी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. तांत्रिक अडचणीमुळे बसचा अपघात झाल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली.

(हेही वाचा छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल…राज ठाकरेंनी आधीचे केलेले सावध; व्हिडिओ व्हायरल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.