जळगाव येथील (Jalgaon Shiv Jayanti) शिरसोली येथे तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. यात ५-६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar : मराठी भाषेतील स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट आजपासून चित्रपटगृहांत; सुबोध भावेची पोस्ट चर्चेत)
नेमका प्रकार काय ?
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार गुरुवारी (२८ मार्च) जयंती होती. सालाबादप्रमाणे जळगाव (Jalgaon Shiv Jayanti) तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सायंकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर येथून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक ढोलताश्यांच्या गजरात वाजत गाजत जात असताना मिरवणूक रात्री ८ वाजेच्या सुमारास मश्जिदीजवळ आली. यावेळी मिरवणुकीतील वाद्य बंद केले होते. त्याच वेळी अचानक या मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे सगळे जण सैरावैरा पळू लागले. (Jalgaon Shiv Jayanti)
(हेही वाचा – Amol Kirtikar : खिचडी घोटाळ्यात लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ED कडून दुसरे समन्स)
५ ते ६ जण जखमी :
या दगडफेकीत (Jalgaon Shiv Jayanti) ५ ते ६ जण जखमी झाले असून यातील विशाल दिलीप पाटील, मंगेश साहेबराव पाटील, बाळू तुळशीराम पाटील हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. (Jalgaon Shiv Jayanti)
गावात सध्या तणावपूर्ण शांतता :
घटनेची (Jalgaon Shiv Jayanti) माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही भेट देत पाहणी केली. (Jalgaon Shiv Jayanti)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community