जळगाव येथून पुणे, गोवा आणि हैदराबाद (Jalgaon to Goa Flight) या तीन मार्गांवर गोव्यातील खासगी विमान कंपनी फेब्रुवारी २०२४पासून UDAN-5.0अंतर्गत विमानसेवा सुरू करणार आहे. फ्लाय 91 च्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन त्यांना नवीन मार्गांची माहिती दिली.
या तिन्ही मार्गांवर 76 आसनी एटीआर चालतील. या सेवेचा विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार आहे. सध्या पुणे आणि जळगाव या दोन्ही शहरांदरम्यान दररोज ५८ बसेस धावतात. पुण्याशी हवाई कनेक्टिव्हिटीमुळे (हवाई प्रवासाद्वारे) जोडले गेल्यामुळे पुणे, गोवा, जळगाव, हैदराबाद येथील रहिवासी आणि विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल, अशी माहिती जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
(हेही वाचा – World Soil Day: जगभरात ‘जागतिक मृदा दिन’ साजरा, जाणून घ्या संवर्धनाचे पर्याय… )
यावेळी ते म्हणाले की, विमान कंपनीने फेब्रुवारी २०२४ मध्ये जळगाव येथून विमानसेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. सध्या कंपनी नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) आणि इतर प्राधिकरणांकडून सर्व आवश्यक परवानगी मिळविण्याच्या प्रक्रियेत व्यग्र आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) द्वारे व्यवस्थापित जळगाव विमानतळावरून कोणतेही व्यावसायिक उड्डाणे होत नाहीत. याआधी एका खाजगी विमान कंपनीने सप्टेंबर 2019 मध्ये जळगाव ते मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू केली होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे विमान कंपनीने एप्रिल 2022 मध्ये सेवा बंद केली.
जळगाव-पुणे मार्गावर पहिले उड्डाण
Fly91च्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले की, फेब्रुवारी २०२४च्या पहिल्या आठवड्यात जळगाव-पुणे मार्गावर पहिले उड्डाण सुरू होईल, जळगाव-गोवा मार्गावर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात विमानसेवा सुरू होईल आणि जळगाव-हैदराबाद मार्गावर मार्चमध्ये विमानसेवा सुरू होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community