Jalna Bus Accident: एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंगचा रॉड तुटून बस २० फूट खोल दरीत कोसळली

178

राज्यसह देशभरात वाहन अपघाताच्या (Vehicle accident) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वाहन अपघाताची अशीच एक घटना जालना जिल्ह्यात झाली आहे. यामध्ये जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC Bus Accident) बसला कोळेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील १५ ते १६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Jalna Bus Accident)

(हेही वाचा – Boxing Day Test : ऑस्ट्रेलियातील उर्वरित दोन कसोटींत अश्विनच्या जागी तनुष कोटियन भारतीय संघात दाखल)

जाफ्राबाद- चिखली रोडवरील (Jaffrabad- Chikhli Road bus accident) कोळेगाव फाट्याजवळ हा अपघात सकाळच्या सुमारास झाला. कोळेगाव फाट्याजवळील घाट रस्ता चढत असताना बस साधारण २० ते २५ फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली. जखमींमधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, घाट रस्ता चढत असताना बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाला. एसटी बस खड्ड्यात पलटी झाल्यानंतर बसमधील प्रवाशांनी प्रचंड आरडाओरड केला. हा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेतली. तसेच मार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधील नागरिकांनी देखील मदतीसाठी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले.

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु; २१०० रुपयांचा हप्त कधीपासून मिळणार ?)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत बोलताना सांगितले होते, ‘रस्ते अपघातांबाबत आपल्या देशाची स्थिती इतकी वाईट आहे की, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये मला तोंड लपवावे लागते.’ रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. तसेच जिवाशी खेळणारी दररोजची अपघातांची मालिका आपल्याला कमी करायची असेल तर शालेय जीवनापासून वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे, हे अभ्यासक्रम तयार करून शिकवावे लागेल. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’संदर्भात नियम आणखी कडक करावे लागतील. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी लागेल. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.