जालन्यातील लाठीमाराच्या (Jalna Maratha Andolan) घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल १९ बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे जवळपास ४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज म्हणजेच ३ सप्टेंबर रविवारीही जालन्यात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे.
जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक (Jalna Maratha Andolan) उपोषणासाठी बसले होते. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर पुढे लाठीमारामध्ये झाले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमारामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आज म्हणजेच रविवार ३ सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.
(हेही वाचा – Maratha Reservation : जालन्यातील आंदोलनाचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद)
घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जालना (Jalna Maratha Andolan) जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे सक्त निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे. फक्तं जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले.
मराठा समाजाला (Jalna Maratha Andolan) आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची असून समाजाला न्याय देण्याची भावना आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामूळे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी बोलताना केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community