जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला (Jalna Maratha Andolan) हिंसक वळण आले आहे. यावेळी मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर शरद पवार लवकरच आंदोलकांची भेट घेणार आहेत. अशातच बीड जिल्ह्यामध्ये आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे.
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं (Jalna Maratha Andolan) उपोषण सुरु होतं. यावेळी कथितरीत्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले आहेत.
(हेही वाचा – GST Collection : ऑगस्ट महिन्यात 1,59,069 कोटींचा एकूण जीएसटी जमा)
जालन्यातील घटनेचे पडसाद राज्यात दिसून येत आहेत. बीडमध्ये आंदोलकांकडून (Jalna Maratha Andolan) बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जालना, बीड, संभाजीनगरमध्ये तणावाची स्थिती आहे. शुक्रवारी (१ सप्टेंबर) धुळे-सोलापूर महामार्गावर १४ गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. माहितीनुसार, आतापर्यंत ४५ पोलिस जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
जालन्यातील (Jalna Maratha Andolan) घटनेचा सर्व स्तरातील नेत्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. उदयराजे भोसले यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला अशी प्रतिक्रिया दिली.
जालन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. नंदूरबारमध्ये (Jalna Maratha Andolan) एका एसटी बसला जाळण्यात आले. तर नंदुरबार आणि जालन्यामध्ये एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापुरातही जाळपोळीची घटना घडली आहे. राज्यात मराठा (Jalna Maratha Andolan) आंदोलनाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community