Jalna MIDC Blast : स्टील कंपनीत भीषण स्फोट, १५ जण गंभीर जखमी

136
Jalna MIDC Blast : स्टील कंपनीत भीषण स्फोट, १५ जण गंभीर जखमी
Jalna MIDC Blast : स्टील कंपनीत भीषण स्फोट, १५ जण गंभीर जखमी

राज्यात मागील काही दिवसांपासून कारखान्यात स्फोट होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यापूर्वी मुंबई जवळील डोंबिवली भागात केमिकल कारखान्यात स्फोट झाला होता. दारम्यान जालना येथील (Jalna MIDC Blast) औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामुळे जालन्यातील एमआयडीसी परिसर हादरला. या स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Jalna MIDC Blast)

(हेही वाचा – गणेशोत्सवात पारंपरिक वादनाला प्रोत्साहन द्या – Chandrakant Patil)

लोखंड वितळणाऱ्या भट्टीत स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात असलेल्या एमआयडीसी परिसरात दुपारीच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज काही किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. एमआयडीसी परिसरात असलेल्या गजकेसरी स्टील कंपनीत (Gajakesari Steel Company) हा स्फोट झाला. या कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. (Jalna MIDC Blast)

(हेही वाचा – Water Supply : पवईतील ‘त्या’ जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण, पाणीपुरवठा होणार सुरळीत )

जखमींवर उपचार सुरु

जालना जिल्ह्यातील (Jalna District Blast) स्फोटात अनेक कामगार जखमी झाले आहेत. या स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. तर तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या या जखमींना जालन्यातील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

(हेही वाचा – T20 Super Over : एकाच टी-२० सामन्यात ३-३ सुपर ओव्हर, देशांतर्गत सामन्यात नवीन विक्रम)

कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जात कंपनीची पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी काय घडलं? याबद्दलची माहिती दिली. एमआयडीमधील (MIDC) एका कंपनीत भंगार धातू वितळणाऱ्या भट्टीत एक वेगळे मेटल गेले. त्यामुळे हा स्फोट झाला. यामुळे तिथे आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. सध्या रुग्णालयात २२ जणांवर उपचार सुरु आहेत. सुदैवाने यात कोणत्याही कामगाराचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान बॉयलरमध्ये स्फोट कसा झाला, त्याचे नेमकं काय कारण होतं हे देखील अद्याप कळू शकलं नाही. (Jalna MIDC Blast)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.