मराठवाड्यात (Marathwada) वंदे भारत एक्सप्रेसचं आगमन झालं असून शनिवार (30 डिसेंबर)पासून ही रेल्वे मुंबई ते जालना धावणार आहे. या ट्रेनला ८ डबे असणार आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या ट्रेनचं लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ही ट्रेन जालन्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होईल.
जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या या ट्रेनची मनमाड ते जालना अशी ट्रायल रन घेण्यात आली. या मार्गावर ही रेल्वे ताशी शंभरच्या स्पीडनं धावली. ही चाचणी यशस्वी झाली. या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससाठी अद्याप तिकिटाचे दर निश्चित करण्यात आलेले नाहीत, मात्र हे दर ९०० ते १२०० रुपयांदरम्यान असण्याची शक्यत आहे.
३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचं ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आलं आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी जालना रेल्वे स्थानकाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला. जालन्याहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याने या भागातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यामुळे प्रवास अधिक गतिमान होऊन प्रवाशांचा वेळ वाचायला मदत होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community