जामा मशिदीचे (Jama Masjid) दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आले. कारण जामा मशिद ही आधी हिंदुंच्या (hindu) हरिहर मंदिर होती. मात्र या ठिकाणी सर्वेक्षणासाठी टीम पोहचली तसेच इस्लामिक कट्टरपंथी जमावाने सर्वेक्षण करणाऱ्यांना घेराव घातला आणि दगडफेक सुरु केली.
हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले ‘ते’ 5 आमदार पराभूत)
कट्टरपंथी जमावाने अबालवृद्धीवर ही हल्ला केला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीहल्ला करत अश्रूधुरांचा मारा केला. दरम्यान नंतर सर्वेक्षण करणारी टीम मशिदीच्या (Jama Masjid)आत पोहचली आणि पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. कोणत्याही तणावपूर्ण वातावरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी पीएसी आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या (Rapid Action Force) जवानांना तैनात केले. (Jama Masjid)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेक्षण टीम सकाळी ६ वाजता जामा मशिदीत पोहचली. या टीमसोबत संभलचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि सिनीयर अधिकारी यांचा समावेश होता. सर्वेक्षण करणारी टीम मशिदीच्या (Jama Masjid) आत जाताच कट्टरपंथी जमावाने त्यांना घेराव घातला. दरम्यान हिंदु (hindu) पक्षाने ९५ पानांमध्ये माहिती देत दावा केला की, हरिहर मंदिर तोडून जामा मशिद बनवण्यात आली आणि मशिद समिती याचा अनाधिकृतपणे उपयोग करत आहे. हिंदू पक्षाचा दावा आहे की, आक्रमणकारी बाबरने १५२९ मध्ये मंदिर तोडून मशिद बांधली. विष्णु शंकर जैनने सांगितले की, मी ऐतिहासिक दस्ताऐवज , साक्षीपुरावे आणि हिंदु आस्थेचा आधार घेत याचिका केला आहे. (Jama Masjid)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community